एक्स्प्लोर
कर्नाटकात एकाच घरात 10 हजार बनावट मतदान कार्ड जप्त
बंगळुरुतील जलाहल्ली भागात एकाच घरात जवळपास 10 हजार बनावट मतदान कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे प्रशासनापासून ते निवडणूक आयोगापर्यंत सगळीकडेच खळबळ माजली आहे.
![कर्नाटकात एकाच घरात 10 हजार बनावट मतदान कार्ड जप्त near about 10 thousand fake voter id cards found in Karnataka ahead of election कर्नाटकात एकाच घरात 10 हजार बनावट मतदान कार्ड जप्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/09224612/karnataka-fake-voter-id.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ तीन दिवस बाकी असताना खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बंगळुरुतील जलाहल्ली भागात एकाच घरात जवळपास 10 हजार बनावट मतदान कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे प्रशासनापासून ते निवडणूक आयोगापर्यंत सगळीकडेच खळबळ माजली आहे.
निवडणूक आयोगाने प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. तर काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. काँग्रेसने या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप केला, तर बुधवारी दिल्लीतही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 9 हजार 746 बनावट मतदान कार्ड सापडले आहेत, ज्याची चौकशी सुरु आहे. काँग्रेस उमेदवाराच्या फ्लॅटमधून हे बनावट मतदान कार्ड सापडल्याचा आरोप भाजपने केला. तर निवडणुकीला बदनाम केल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा मागितला. शिवाय बादामीतून सिद्धरमैय्या यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपने केली.
काँग्रेसने प्रत्युत्तर देत भाजपच्या महिला उमेदवारावर आरोप केला आहे. ज्या घरातून बनावट मतदान कार्ड सापडले आहेत, ते भाजपच्या महिला नेत्याचं घर असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर या घरात भाजपच्या महिला नेत्याचा दत्तक मुलगा राहतो, असं स्पष्टीकरण भाजपने दिलं.
कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी काल रात्री याच मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. बंगळुरुतील आरआर नगर भागातील एका फ्लॅटमधून 9 हजार 746 बनावट मतदान कार्ड मिळाले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती संजीव कुमार यांनी दिली.
कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)