एक्स्प्लोर

Rajya Sabha : मोठी बातमी, राज्यसभेतील 12 जागांचे उमेदवार बिनविरोध, भाजप आता राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष

Rajya Sabha : राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. 12 पैकी एनडीए (NDA)ला 11 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर काँग्रेसने विजय मिळाला आहे.

Rajya Sabha : राज्यसभेमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एनडीएचे 11 सदस्य राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे राज्यसभेतील एनडीएचे सदस्य संख्या आता 115 वरती गेली आहे. 96 सदस्यासह भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. 12 पैकी एनडीए (NDA)ला 11 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर काँग्रेसने विजय मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपच स्थान आणखी मजबूत झालं आहे. एनडीए (NDA) आघाडीकडे आता पूर्ण बहुमत आहे. आता राज्यसभेत कोणतही विधेयकं मंजूर करुन घेताना  मोदी सरकाला फार अडचणी येणार नाहीत. आता मोदी सरकारकडे मोठं बहुमत आहे. (NDA Crosses Majority Mark in Rajya Sabha As 12 Members Elected Unopposed)

राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. त्या 12 जागांमध्ये भाजपाचे 9 आणि सहकारी पक्षाचे 2 सदस्य यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकली आहे. राजस्थानमधून भाजपाचे रवनीत सिंह बिट्टू, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन आणि बिहारमधून मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिहारमधून एनडीएचा भाग असलेल्या राष्ट्रीय लोक पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाहा देखील विजयी झाले आहेत.

निवडणूक आयोगाने राज्यसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान पार पडणार होतं. तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट होती. अर्ज मागे घेण्यासाठी 27 ऑगस्ट होती. निवडणूक पार पडण्याआधीच सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यसभेचं संख्याबळ 245 आहे. यात आठ जागा रिकामी आहेत. यात जम्मू-काश्मीरच्या चार जागा आहेत. सध्या सदनाच संख्याबळ 237 आहे.

कोणत्या पक्षाची किती संख्या?

राज्यसभेत भाजपाचे 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता त्यांची संख्या 96 वरती पोहोचली आहे. सहकारी घटक पक्षांचे 16 खासदार अशी राज्यसभेत एनडीएची संख्या 112 इतकी झाली आहे. 6 मनोनीत आणि एका अपक्षाच्या समर्थनाने बहुमताचा आकडा गाठला आहे. बुहमताचा आकडा गाठण्यासाठी 119 सदस्यांची गरज असते. 

आता NDA ला कोणतही विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी बीजेडी, YSR काँग्रेस, बीआरएस आणि AIADMK वर अवलंबून राहावे लागणार नाही. जेडी(यू), एनसीपी, जेडी(एस), आरपीआय(ए), शिवसेना, आरएलडी, आरएलएम, एनपीपी, पीएमके, तमिल मनीला काँग्रेस आणि यूपीपीएल हे पक्ष NDA सोबत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमाABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget