एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एनडीएचा अखेर विजय, हरिवंश सिंह राज्यसभेचे उपसभापती

राज्यसभेत उपसभापती निवडणुकीसाठी दोन वेळा मतदान झालं. पहिल्या वेळी हरिवंश सिंह यांना 115 तर दुसऱ्या वेळी त्यांना 125 मतं मिळाली.

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपल्या उमेदवाराच्या विजयासह पुन्हा एकदा विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लावला. यूपीएचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांना पराभूत करत एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह 25 मतांनी विजयी झाले आहेत. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली तर बीके हरिप्रसाद यांना 105 मतं मिळवता आली. 245 सदस्यांच्या राज्यसभेत सध्या 244 खासदार आहेत, तर एक जागा रिक्त आहे. पण 230 खासदारांनीच मतदानात सहभाग घेतला. एनडीएच्या या विजयात सर्वात मोठं योगदान बीजू जनता दलाचं आहे. अनेत मतभेदानंतरही बीजेडी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मतदान केलं. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हरिवंश सिंह यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांना शुभेच्छा देत मिळून जनतेच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचं आवाहन केलं. दोन वेळा मतदान राज्यसभेत उपसभापती निवडणुकीसाठी दोन वेळा मतदान झालं. पहिल्या वेळी हरिवंश सिंह यांना 115 तर दुसऱ्या वेळी त्यांना 125 मतं मिळाली. पहिल्यांदा काही मतं योग्य पद्धतीने न झाल्याने पुन्हा मतदान घेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनानंतर ओदिशाच्या बीजेडी, तामिळनाडूच्या एआयएडीएमके आणि तेलंगणाच्या टीआरएने एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना साथ दिली. त्यामुळे विरोधकांच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला. कोण आहेत हरिवंश सिंह? हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म 30 जून 1956 रोजी बलिया जिल्ह्यातील सिताबदियारा गावात झाला होता. हरिवंश जेपी आंदोलनामुळे प्रेरित झाले होते. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात एमए आणि पत्रकारितेत डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स समूहातून केली होती. बँक ऑफ इंडियातही नोकरी यानंतर हरिवंश सिंह यांच्याकडे धर्मयुग या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1981 पर्यंत हरिवंश सिंह धर्मयुगचे उपसंपादक होते. यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडली आणि 1981 पासून 1984 पर्यंत हैदराबाद, पाटणामध्ये बँक ऑफ इंडियात नोकरी केली. 1984 मध्ये ते पुन्हा एकदा पत्रकारितेत परतले आणि 1989 पर्यंत त्यांनी 'आनंद बाजार पत्रिका'च्या 'रविवार' या साप्ताहिकाचे सहाय्यक संपादक म्हणून काम केलं. 2014 मध्ये हरिवंश सिंह पहिल्यांदा संसदेत नव्वदच्या दशकात हरिवंश सिंह बिहारमधील एका मोठ्या मीडिया समूहात रुजू झाले. इथे त्यांनी दोन दशकांपेक्षा जास्त काळ काम केलं. आपल्या कार्यकाळादरम्यान हरिवंश सिंह यांनी बिहारशी संबंधित अनेक गंभीर विषयांना वाचा फोडली. याचदरम्यान त्यांची नितीश कुमार यांच्याशी जवळीत वाढली. त्यानंतर हरिवंश सिंह यांची जेडीयूचे सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. 2014 मध्ये जेडीयूने हरिवंश यांना राज्यसभेसाठी नामांकित केलं. अशाप्रकारे हरिवंश सिंह पहिल्यांदा संसदेत पोहोचले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagraj Manjule Summons : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गंभीर प्रकरणात पुणे कोर्टाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर Superfast News ABPमाझाSanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Embed widget