एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, अहमद पटेलांना दे धक्का!

'पक्षानं भाजपला मतदान करायला सांगितलं आहे.' असा दावा गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जडेजा यांनी केला आहे.

नवी दिल्ली : गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना मोठा झटका बसला आहे. 'पक्षानं भाजपला मतदान करायला सांगितलं आहे.' असा दावा गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जडेजा यांनी केला आहे. त्यामुळे आता ऐनवेळी काँग्रेसच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. काँग्रेसचे गुजरातमधील सहा आमदार भाजपनं फोडल्यानंतर अहमद पटेल यांची सारी भिस्त राष्ट्रवादी काँग्रेसवर होती. मात्र, ऐनवेळी भूमिका बदलून राष्ट्रवादीनं भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं पटेलांची वाट आणखी बिकट झाली आहे. राष्ट्रवादीचे गुजरातमध्ये दोन आमदार आहेत. आज संध्याकाळी उशीरापर्यंत राष्ट्रवादीनं याबाबत कोणताही व्हीप जारी केला नव्हता. पण मतदानासाठी अवघे काही तास उरलेले असताना राष्ट्रवादीनं काँग्रेसला मोठा धक्का दिला. भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी यांचा विजय पक्का आहे. पण काँग्रेसचे फुटीर आमदार बलवंतसिंह राजपूत यांच्या रुपानं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून भाजपनं अहमद पटेलांची पुरती नाकाबंदी केली आहे. शंकरसिंह वाघेला यांच्या बंडाळीचा फायदा घेत भाजपनं काँग्रेसचे आत्तापर्यंत सहा आमदार फोडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 57 वरुन 51 वर पोहचली आहे. अहमद पटेल यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 45 मतांची गरज आहे. काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना गेल्या आठवडाभरापासून बंगळुरुच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. या आमदारांना सोमवारी गुजरातमध्ये आणलं गेलं. आणंद इथल्या रिसॉर्टमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली असून इथून थेट मतदानालाच त्यांना आणलं जाईल. संबंधित बातम्या : प्रतिष्ठेच्या लढतीत अहमद पटेलांची भिस्त राष्ट्रवादीवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAmbernath : प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा, अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर!Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा  : 03 February 2025 : 05PM : ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार

एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप

Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा

Embed widget