एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coronovirus | माध्यम प्रतिनिधींनी रुग्णालयात जाऊन डॉक्टर, रुग्णांना भेटू नये; NBSA चा सल्ला

काही चॅनेल्सचे प्रतिनिधी थेट रुग्णलयात जाऊन डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे माध्यम प्रतिनिधींना रुग्णालयात जाऊन डॉक्टर, रुग्णांना भेटू नये असा सलल्ला बातमी प्रसारण आणि मानक प्राधिकरणने (NBSA) दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. कोणीही ऐकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी प्रशासन विशेष काळजी घेत आहे. कोरोना विषयी योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यात माध्यमं योग्य भूमिका निभावताना दिसत आहे. मात्र, काही चॅनेलचे पत्रकार रुग्णलयात प्रवेश करणे, कोरोनाबाधित व्यक्तीला भेटत असल्याचे बातमी प्रसारण आणि मानक प्राधिकरणच्या (NBSA) निदर्शनास आले. परिणामी यापुढे कोणत्याही पत्रकार, अथवा चॅनेलची व्यक्तीने अशा संवेदनशील ठिकाणी जाऊ नये असा सल्ला एनबीएसएने दिला आहे.

कोरोना व्हायरस विषयी जाणून घेण्यात सर्वांनाच रस आहे. यासाठी वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी चॅनेलची धडपड सुरू असते. परिणामी अनेक चॅनेल्सचे पत्रकार, कॅमेरामन थेट रुग्णालय, आयसोलेशन वॉर्डमध्ये प्रवेश करत आहेत. यातील अनेकजण याठिकाणी काम करत असलेल्या डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहेत. कोरोना संशयितांच्याही मुलाखती समोर आल्या आहेत. कोरोना हा जीवघेणा विषाणू वेगाने देशभर पसरत आहे. अशावेळी त्याची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. पत्रकारांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. हे लक्षात आल्याने एनबीएसएने माध्यम प्रतिनिधिंना रुग्णालयात प्रवेश न करण्याचा सल्ला दिला आहे.

Coronavirus | देशात 24 तासात कोरोनाचे 678 नविन रूग्ण, 33 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालय

नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचा आदर करा माध्यमांनी लोकांचे मलभूत अधिकार आणि प्रायव्हसीची काळजी घेण्याचा सल्ला देखील बातमी प्रसारण आणि मानक प्राधिकरणने दिला आहे. या सल्ल्याची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यासही सांगण्यात आलं आहे. कोरोना आजाराविषयी लोकांच्या मनामध्ये अजूनही संभ्रम आहे. लोक आता साधा खोकला तरी संशयाच्या नजरेने पाहत आहे. तर, कोरोना संशयित असलेल्या कुटुंबांना वाळीत टाकण्याचेही अनेक प्रकार समोर आले आहे. माध्यमांमध्ये बऱ्याचदा कोरोना बाधितांची नावे आणि चेहरे दाखवले जातात. यामुळे अनेक ठिकाणी त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. परिणामी बातमी प्रसारण आणि मानक प्राधिकरणने हा निर्णय घेतला आहे.

coronavirus | मुलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मुलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवं : हायकोर्ट

कोरोनाचा आकडा वाढला देशात कोरोना बाधितांचा आकडा साडेसहा हजाराच्या पुढे गेलाय. आताच्या घडीला देशात 6761 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालंय. यात यात महाराष्ट्रात सर्वाधिक 1574 लोक कोरोनाबाधित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. तरीही कोरोनाची संख्या कमी होताना दिसत नाहीय.

Corona Awareness by Bharud | अग ग... भारुडातून कोरोना विषयी प्रबोधन | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget