एक्स्प्लोर

गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं?

इंफाळ/पणजी : गोव्यात भाजपने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर मणिपूरमध्येही भाजपने मॅजिक फिगर गाठत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांच्याकडून सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण पत्र मिळाल्याची माहिती मणिपूरचे केंद्रीय पर्यवेक्षक प्रकाश जावडेकर यांनी दिली. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पंजाबनंतर गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांमध्ये भाजपला यश मिळाल्याचं चित्र आहे. कारण दोन्हीही राज्यात स्थानिक पक्षांचा पाठिंबा मिळवण्यात भाजपला यश मिळालं आहे. गोव्यात भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मनोहर पर्रिकरांना गोव्यात पाठवण्याच्या अटीवर भाजपला पाठिंबा मिळाला. त्यानंतर भाजपने 40 आमदार असलेल्या गोवा विधानसभेचा 21 हा बहुमताचा आकडा राज्यपालांसमोर सादर केला. त्यानंतर गोव्याच्या राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केलं आहे. गोवा विधानसभेत काँग्रेसला 17, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पक्षाला 3, अपक्षांना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अटीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि 2 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप आणि इतर पक्षांचे मिळून एकूण 21 आमदारांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. तसंच बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला आहे. काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव दरम्यान काँग्रेसने गोव्यात भाजपच्या सरकार स्थापनेच्या दाव्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तसंच मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देण्यासाठी काँग्रेसने राज्यपालांना पत्र दिलं आहे. मणिपूरमध्येही भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या 15 वर्षांपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र यावेळी सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसची मणिपूरमध्ये पिछेहाट झाली आहे. भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी दावा केला असून राज्यपालांसमोर बहुमताचा आकडा सादर केला. भाजपने स्वतःचे 21, एनपीपीचे अध्यक्ष आणि चार आमदार, एक काँग्रेस आमदार, एक एलजेपी आमदार आणि तृणमूलच्या एका आमदारासोबत राज्यपालांची भेट घेतली. 60 आमदार असलेल्या मणिपूर विधानसभेसाठी 31 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपने आपलं संख्याबळ 32 असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं. त्यानंतर राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी सत्ता स्थापनेचं पत्र दिल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली. गोव्यात कुणाला किती जागा? उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपला गोव्यात काँग्रेसनं काँटे की टक्कर दिली. गोव्याच्या 40 जागांच्या विधानसभेत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला. काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला. मात्र 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला सत्ताधारी भाजप सत्तेसाठी छोट्या पक्षांची मदत घेण्यास यशस्वी ठरला.
  • भाजप – 13
  • काँग्रेस – 17
  • राष्ट्रवादी काँग्रेस -1
  • महाराष्ट्रवादी गोमंतक – 3
  • गोवा फॉरवर्ड पार्टी – 3
  • अपक्ष/इतर – 3
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. इतर पक्षांचा पाठिंबा मिळत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर इबोबी सिंह यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर इबोबी सिंह यांनी बहुमत असल्याचा दावा करत राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही वेळातच राजीनामा देण्याची घोषणा केली. इबोबी सिंह यांनी राजीनामा दिल्याशिवाय नवीन सरकार स्थापनेची पुढील प्रक्रिया केली जाऊ शकत नाही. त्यामुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना राजीनाम्याचे आदेश दिले होते. राज्यपालांच्या भेटीदरम्यान इबोबी सिंह यांनी काँग्रेसच्या 28 आमदारांची यादी सादर करत सरकार स्थापनेचा दावा केला होता. शिवाय नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) च्या चार आमदारांचा पाठिंबा असल्याचाही दावा केला. मात्र एनपीपीने आपला काँग्रेसाला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानतंर इबोबी सिंह यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? मणिपूरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवी झुंज दिली. 60 जागांच्या मणिपूर विधानसभेत काँग्रेसने 26 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला 21 जागा जिंकता आल्या. मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.
  • भाजप – 21
  • काँग्रेस – 26
  • नागा पीपल फ्रंट – 4
  • नॅशनल पीपल्स पार्टी – 4
  • तृणमूल काँग्रेस  -1
  • अपक्ष – 1
  • लोकजनशक्ती पार्टी – 1
संबंधित बातम्या :

गोव्यात भाजपचा सरकार स्थापनेचा दावा, काँग्रेस सुप्रीम कोर्टात

भाजपचा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, भाजपचा सरकार स्थापनेचा दावा

पर्रिकरांचा राजीनामा, अरुण जेटली पुन्हा संरक्षण मंत्री!

पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल

देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई
धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई
H-1B Visa च्या फी वाढीचा पहिला फटका, इन्फोसिस, विप्रोच्या ADR मध्ये घसरण, सोमवारी आयटी स्टॉक्स कोसळणार?
H-1B Visa च्या फी वाढीचा पहिला फटका, इन्फोसिस, विप्रोच्या ADR मध्ये घसरण, सोमवारी आयटी स्टॉक्स कोसळणार?
Ind vs Pak: आम्ही सदैव राष्ट्रासोबत, सोनी टीव्हीचं शिवसेनेला पत्र; भारत-पाक सामन्यासंदर्भात मागितली माफी
Ind vs Pak: आम्ही सदैव राष्ट्रासोबत, सोनी टीव्हीचं शिवसेनेला पत्र; भारत-पाक सामन्यासंदर्भात मागितली माफी
नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक
नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई
धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई
H-1B Visa च्या फी वाढीचा पहिला फटका, इन्फोसिस, विप्रोच्या ADR मध्ये घसरण, सोमवारी आयटी स्टॉक्स कोसळणार?
H-1B Visa च्या फी वाढीचा पहिला फटका, इन्फोसिस, विप्रोच्या ADR मध्ये घसरण, सोमवारी आयटी स्टॉक्स कोसळणार?
Ind vs Pak: आम्ही सदैव राष्ट्रासोबत, सोनी टीव्हीचं शिवसेनेला पत्र; भारत-पाक सामन्यासंदर्भात मागितली माफी
Ind vs Pak: आम्ही सदैव राष्ट्रासोबत, सोनी टीव्हीचं शिवसेनेला पत्र; भारत-पाक सामन्यासंदर्भात मागितली माफी
नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक
नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक
त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण, मंत्रालयातून दखल घेत गंभीर गुन्हा दाखल; तिघांना अटक
त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण, मंत्रालयातून दखल घेत गंभीर गुन्हा दाखल; तिघांना अटक
Ladki Bahin Yojana: E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं, पोस्ट शेअर
E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B Visa चं शुल्क वाढवलं, भारताची पहिली प्रतिक्रिया, विदेश मंत्रालयानं काय म्हटलं?
ट्रम्प यांनी H-1B Visa चं शुल्क वाढवलं, भारताची पहिली प्रतिक्रिया, विदेश मंत्रालयानं काय म्हटलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
Embed widget