एक्स्प्लोर

अमृतसर अपघात, नवजोत कौर यांनी घटनास्थळाहून पळ काढला : प्रत्यक्षदर्शी

नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योक कौर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमाला उशिरा आल्या, तसेच रेल्वे अपघात होताच घटनास्थळाहून पळ काढला, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये भीषण अपघात झालाय. रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असलेल्या लोकांवर ट्रेन चढली, ज्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडलेले आहेत. पोलिसांच्या मते, या अपघातात 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेने मात्र अजून कोणताही अधिकृत आकडा सांगितलेला नाही. या कार्यक्रमासाठी पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांचीही उपस्थिती होती. पण हा अपघात होताच नवज्योत कौर घटनास्थळाहून निघून गेल्या, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. हा आरोप करत नवज्योत सिंह सिद्धू यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली जात आहे. नवज्योत कौर यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. कार्यक्रम संपवून निघून गेल्यानंतर 15 मिनिटांनी ही घटना घडली, असा फोन आल्याचं नवज्योत कौर यांनी म्हटलं आहे. नवज्योत कौर सध्या जखमींसोबत असल्या तरी त्यांनी घटनास्थळाहून पळ काढल्याचा आरोप करत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावरही नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण, त्यांनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले असले तरी ते उद्या अमृतसरला जाणार आहेत. एकीकडे केंद्रातील रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि सर्व अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांना रात्रभर झोप लागेल का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. अपघातावर कोण काय म्हणालं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले असल्याचं मोदींनी म्हटलंय. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या अपघाताच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे. ते स्वतः उद्या अमृतसरला जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना मोफत उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना मदतकार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत अमित शाहांनी जखमींनी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत रेल्वेकडून सर्व प्रकारचं सहाय्य केलं जात असल्याचं सांगितलं आहे. रेल्वेचं स्पष्टीकरण रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड चेअरमन आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी रात्रीच घटनास्थळावर पोहोचणार आहेत. ही घटना रेल्वे फाटकापासून काही अंतरावर घडली, जिथे लोक रेल्वे रुळावर उभे होते, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्मिता वत्स यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 07 March 2025Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्दNitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगीAmbadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने एकूण किती कोटी वाटले? आर्थिक पाहणी अहवालात महत्त्वाची माहिती समोर
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
Embed widget