एक्स्प्लोर

Congress Protest : महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशव्यापी आंदोलन, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव

Congress Protest : महागाई आणि बेरोजगारीविरोधात आज काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन आहे. काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Congress Protest : काँग्रेसने (Congress) आज (5 ऑगस्ट) महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर एक पाऊल पुढे जात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (4 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत 'मी मोदींना अजिबात घाबरत नाही. सत्य दडपता येत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण सत्याला आळा घालता येत नाही," असं म्हटलं होतं.

दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली
काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. "जंतर-मंतर वगळता, नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण भागात CrPC कलम 144 लागू आहे. सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, रहदारीच्या कारणांमुळे 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली जिल्ह्यातील परिसरात आंदोलन/धरणे/घेरावाला परवानगी देता येणार नाही," असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राहुल गांधी म्हणाले होते की, "लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. पोलीस परवानगी देत ​​नाहीत, ठीक आहे, रोखून दाखवा."

राष्ट्रपती भवनावर मोर्चा, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, "वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादल्याच्या विरोधात काँग्रेस दिल्लीत निदर्शने करणार आहे. याशिवाय राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार असून पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव देणार आहोत." काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत.

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, "आम्ही राष्ट्रपती भवनावरील मोर्चासाठी परवानगी मागितली आहे आणि पक्षाच्या 80 हून अधिक खासदारांना तिथे शांततेने जाण्याची परवानगी दिली जाईल अशी अपेक्षा आहे. तसंच पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेरावही घातला जाणार आहे, ज्यामध्ये CWC सदस्य आणि वरिष्ठ नेते सहभागी होतील. 

राज्यांमध्ये 'राजभवन घेराव' असेल
दिल्लीत राष्ट्रपती भवनावर मोर्चा तर विविध राज्यात राजभवनाला घेराव घालण्यास काँग्रेसने सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी 'राजभवन घेराव' आयोजित करण्यास सांगितलं आहे, ज्यात आमदार, विधानपरिषदेचे सदस्य, माजी खासदार आणि राज्य युनिटचे वरिष्ठ नेते सहभागी होतील.

जिल्हा मुख्यालयावर निदर्शने, धरपकड
पंचायतीपासून ते जिल्हास्तरापर्यंत काँग्रेसचे लोकप्रतिनिधी जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करुन जेलभरो करतील, असा निर्णयही पक्षाने घेतला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget