(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Safety Day 2021: आज राष्ट्रीय सुरक्षा दिवस, जाणून घ्या काय आहे त्याचे महत्व
देशभर दरवर्षी 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस (National Safety Day ) साजरा केला जातोय. याचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे हा आहे.
नवी दिल्ली: देशभरात आज राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातोय. सध्या हा दिवस एका सप्ताहाच्या स्वरूपात साजरा केला जातोय. देशातील नागरिकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे आणि देशातील दुर्घटना थांबवणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना आज देशभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात. काम करताना घ्यावयाची काळजी, मोठ्या औद्योगिक ठिकाणी काम करताना टाळावयाच्या गोष्टी, तसेच इतर अनेक दुर्घटना टाळण्यासाठी काय करावं लागतं यासाठी मार्गदर्शन केलं जातं.
देशाच्या सीमेवर लाखो जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेची काळजी घेत असतात. त्यांनाही आजचा दिवस समर्पित केला जातो.
World Wildlife Day 2021: आज साजरा केला जातोय जागतिक वाईल्डलाईफ दिवस, काय आहे त्याचं महत्व?
राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिल ने देशात राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्याची शिफारस केली होती. या दिवसाची सुरुवात 1972 साली करण्यात आली. भारतात 4 मार्च 1966 साली नॅशनल सेफ्टी काऊन्सिलची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळेच या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
नॅशनल सेफ्टी काऊन्सिल एक अशासकीय पद्धतीने आणि ना नफा ना तोटा या तत्वावर काम करते. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना एक थीम आयोजित केली जाते. या वर्षीची थीम 'सडक सुरक्षा' (Road Safety) अशी आहे. भारतात रस्त्यावरील दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दरवर्षी हजारो लोक त्याला बळी पडतात. त्यामुळे वाहणे चालवताना वाहतूकीचे आवश्यक नियम पाळणे, काळजी घेणे गरजेचं असतं. त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी या वर्षी रोड सेफ्टी या थीमवर भर देण्यात आला आहे.