National Dengue Day 2022 : डेंग्यू (Dengue Fever) हा अत्यंत गंभीर आजारांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. तर काही लोकांसाठी हा आजार जीवघेणाही ठरतो. विशेषतः पावसाच्या सुरुवातीच्या काळात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. अशा परिस्थितीत लोकांनी डेंग्यू या आजाराबाबत जागरुकता बाळगली पाहिजे. दरवर्षी 16 मे हा 'राष्ट्रीय डेंग्यू दिवस' म्हणून साजरा केला जातो. यामागचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. 

आज आम्ही तुम्हाला राष्ट्रीय डेंग्यू दिवस का साजरा केला जातो, याचं कारण आणि इतिहास याबद्दल माहिती देणार आहोत.

राष्ट्रीय डेंग्यू दिवसाचा इतिहासदरवर्षी 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना या आजाराबद्दल जागरुक करणे आणि त्याची लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल माहिती देणे. हा दिवस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागरुकता असली तरी तरीही ते या आजाराला बळी पडतात. डेंग्यू या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्याबाबत अचूक माहिती व्हावी यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

डेंग्यू आजाराची कारणेडेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे. साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या वाढतात. डेंग्यूचा डास चावल्याने डेंग्यू होतो. जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात. डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात.

डेंग्यू रोगाची लक्षणे

  • ताप
  • डोकेदुखी
  • डोळे दुखणे
  • सांधे आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवणे
  • थकवा
  • उलट्या होणे
  • मळमळ
  • त्वचेवर पुरळ उठणे
  • नाक, हिरड्यांमधून रक्तस्त्राव

डेंग्यू टाळण्यासाठी उपाय

  • तुमच्या घराच्या आत किंवा बाहेर डासांची पैदास होऊ देऊ नका.
  • घरामध्ये घाण पाणी साचू देऊ नका.
  • भांड्यात पाणी किंवा छतावर इतर कोणतीही वस्तू असल्यास लगेच फेकून द्या.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • डेंग्यूचा डास हा सामान्य डासांपेक्षा वेगळा असतो आणि तो दिवसा चावतो. 
  • घरामध्ये आणि आजूबाजूला डासांची पैदास होऊ देऊ नका.
  • उन्हाळ्यामुळे जवळपास सर्वच घरांमध्ये कुलरचा वापर केला जातो. कुलरमध्ये पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळ्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत कूलर वापरल्यानंतर लगेचच त्यातील पाणी रिकामे करा.
  • पावसाळ्यात कुंड्या, बाटल्या किंवा इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नका.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

Check out below Health Tools-Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator