Health Tips : यकृत हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यकृत शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. अन्न पचवण्यात यकृत महत्त्वाची भूमिका बजावते. ज्या लोकांचे यकृत नीट काम करत नाही, त्यांना पचनाशी संबंधित समस्या कायम राहतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यकृत संपूर्ण शरीरात रक्त स्वच्छ करण्याचे काम करते. यकृताशी संबंधित समस्या असल्यास खाण्यापिण्याची काळजी घ्या. यकृत निरोगी ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ खा. 


1. लसूण - ज्यांचे यकृत कमजोर आहे त्यांनी लसूण जरूर खावे. लसूण खाल्ल्याने यकृतातील एन्झाइम्स सक्रिय होतात, त्यामुळे यकृत स्वच्छ राहते. लसूण यकृत मजबूत करते.


2. लिंबू - लिंबू यकृतासाठीही फायदेशीर आहे. लिंबूमध्ये D-limonene नावाचे तत्व असते जे यकृताच्या पेशी सक्रिय करते. यामुळे यकृत स्वच्छ होते. रोज लिंबू पाणी प्यायल्याने यकृताला फायदा होतो.  


3. ग्रीन टी - यकृत मजबूत करण्यासाठी रोज ग्रीन टी प्या. यामुळे चरबी कमी होते आणि शरीर डिटॉक्स होते. ग्रीन टी यकृताला हानिकारक प्रभावापासून वाचवण्याचे काम करते. 


4. हळद - यकृत स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर करा. हे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच चरबीचे पचन होण्यास मदत होते. तुम्ही 1/4 चमचे हळद पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा. आता हे पाणी उकळून प्या. 


5. बीट - यकृत स्वच्छ करण्यासाठी आणि यकृत निरोगी करण्यासाठी बीटरूट खा. बीटरूटमध्ये बीटा कॅरोटीन असते जे यकृताला उत्तेजित करण्याचे काम करते. यामुळे यकृताची कार्य क्षमता सुधारते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.