Hiccup Symptoms : छातीमध्ये विभाजक पडदा (डायफ्रॅम) असतो. तो स्नायूंचा बनलेला असतो. कधी कधी आकस्मिकपणे या स्नायूंचे आकुंचन होते. हे आकुंचन सर्वस्वी अनैच्छिक असते. बऱ्याच वेळा ते पाठोपाठ काही वेळा होत राहते. अशा आकुंचनानंतर स्वरयंत्रणेतील पट्ट्या एकमेकाजवळ येतात. या घटनेला ‘उचकी लागली' असे म्हटले जाते.


या संदर्भात डॉ. स्वाती मिश्रा मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशालिस्ट यांनी असे सांगितले आहे की, "उचकी लागणे, ही एक ‘रिफ्लेक्स अॅक्शन' आहे. या प्रतिक्षिप्त क्रियेचे केंद्र मेंदूतील ब्रेनस्टेम या भागातील खालच्या भागात असते. फ्रेनिक आणि व्हेगस या शिरांतून या केंद्राकडे जाणाऱ्या उद्दीपनात्मक लाटांमुळे हे केंद्र उद्दीपित होते. फ्रेनिक शिरेतून विभाजक पडद्याला उत्तेजन मिळते आणि ते स्नायू आकुंचित पावतात. ‘उचकी' या प्रकारात स्नायूंचे काही तंतू आकुंचन पावतात आणि पुन्हा पुन्हा तसेच होत राहते."


वारंवार उचकी येण्याची कारणे : 



  • अन्ननलिकेच्या अस्तराच्या दाहामुळे उचकी लागते. असा प्रकार जठरातून अन्ननलिकेत जाणाऱ्या अॅसिडयुक्त रसांमुळे होतो.

  • अति प्रमाणात कोल्ड्रिंक्स पिणे.

  • अति प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करणे

  • जास्त प्रमाणात अन्न खाणे. 

  • अति उत्साह किंवा मानसिक तणाव 

  • अचानकपणे शरीराचे तापमान बदलणे. 

  • च्विंगम खाताना अति प्रमाणात चघळणे.


किती काळापर्यंत उचकी राहू शकते ? 


सामान्यत: उचकी काही मिनिटांसाठी राहते. अशा वेळी त्यावर विविध घरगुती उपाय करून तिला थांबवले जाते. 


यावर उपाय काय ? 


जर तुम्हाला सतत उचकी लागत असेल तर यावर काही घरगुती उपाय केले जातात. ते म्हणजे पाणी पिणे, साखर खाणे, काळी मिरी आणि खडीसाखर तोंडात ठेवणे, तसेच लिंबू आणि मधाचे मिश्रण एकत्र करून खाणे इ. हे काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :