Benefits of Ajwain : ओवा बहुतेक भारतीय घरांमध्ये वापरला जातो. ओवा खूप उष्ण असतो, त्यामुळे बहुतेक लोक फक्त हिवाळ्यातच ओव्याचा आहारात समावेश करतात. मात्र ओव्याचा वापर उन्हाळ्यातही फायदेशीर ठरतो. फक्त हिवाळ्याच्या तुलनेत याचा वापर कमी प्रमाणात करावा. जाणून घ्या उन्हाळ्यात ओव्याचे सेवन कशाप्रकारे कराल.
उन्हाळ्यात ओवा खाण्याचे फायदे
उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होतात, कारण गरमीमुळे शिजवलेले अन्नामध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढू लागतात. असे अन्न खाल्ल्यास पोट आणि पचनक्रिया बिघडते. यामुळे जुलाब, पोटदुखी, उलट्या, मळमळ यासारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही नियमितपणे ओव्याचे सेवन करत असाल तर तुमच्या पोटात रोगाचे जंतू पोहोचल्यानंतरही तुमचं नुकसान करू शकत नाहीत.
ओवा वापरण्याची पद्धत
उन्हाळ्यात औषधाच्या स्वरूपात ओव्याचे सेवन करणे लाभदायक ठरते. हिवाळ्यात, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती पीठ मळून किंवा भाज्या नियमितपणे खाल्ल्यास फायदेशीत ठरते. तर उन्हाळ्यात जास्त गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर दिवसातून एकदा एक चतुर्थांश चमचा ओवा पाण्यासोबत खाल्याने पचन सुधारते. ओवा तुमचे पोट आणि पचन तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी आहे. तसेच यामुळे हंगामी आजारांपासून तुमचं संरक्षण होईल.
घरच्या कुंडीत लावलेली ओव्याची पानंही तुम्ही खाऊ शकता. ओव्याची दोन पाने घेऊन रोज जेवणानंतर चिमूटभर काळ्या मीठासह चावून खावीत. असं केल्यानं पचनक्रिया सुधारते आणि पोट खराब होत नाही.
कोशिंबीर
ओवा वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे ओवा आणि जिरे समान प्रमाणात भाजून घ्या. ओवा आणि जिरे तेल न वापरता चुलीवर हलके भाजून घ्या. ते चांगले भाजून झाल्यावर खलबत्यामध्ये ठेचून किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर बनवा. आता तुम्ही केव्हाही कोशिंबीर बनवता किंवा दही खाता तेव्हा पावडर कोशिंबीरीमध्ये किंवा दह्यामध्ये चिमूटभर मिसळून खा. यामुळे दही आणि कोशिंबीरीची चवही वाढेल आणि तुमची पचनशक्तीही सुधारेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : यकृतासाठी या 5 गोष्टी आहेत वरदान; रक्तही होईल स्वच्छ
- Diabetes Control : शुगर कंट्रोलही करायचाय आणि गोडही टाळता येत नाहीये? तर, 'हे' 5 उपाय फॉलो करा
- Hiccup : पुरेसे पाणी पिऊनही वारंवार उचकी का येते? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )