India Coronavirus Update : देशात कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावात कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सलग चार आठवड्यांच्या वाढीनंतर, गेल्या रविवारी संपलेल्या आठवड्यात देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये जवळपास 20 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे, दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोना प्रादुर्भावात सातत्यानं घट होत आहे. 9 ते 15 मे दरम्यानच्या आठवड्यात भारतात कोरोनाच्या सुमारे 18 हजार 500 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात (2-8 मे) सुमारे 23 हजार नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद (Corona) करण्यात आली होती.


गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. गेल्या आठवड्यात 20 मृत्यू झाले होते, तर या आठवड्यात कोरोनामुळे 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत आठवडाभरात 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. 21-27 फेब्रुवारीपासून देशाच्या राजधानीत मृत्यूची ही सर्वाधिक साप्ताहिक आकडेवारी आहे. त्याच वेळी, 9-15 मे दरम्यान दिल्लीतील नव्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत 37 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. 


गेल्या आठवड्यात दिल्लीत कोरोनाच्या 6104 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. जे गेल्या आठवड्यापेक्षा कमी आहेत. यासाठी एनसीआरमधील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये झालेली घट कारणीभूत आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्य जिथे एनसीआरची बहुतांश शहरं आहेत. त्या शहरांमध्येही कोरोना प्रादुर्भावात घट झाली आहे. हरियाणात, 9-15 मे दरम्यान साप्ताहिक रुग्णसंख्येत 28 टक्क्यांची घट झाली असून कोरोनाबाधितांची संख्या 2,593 वर आली आहे. तर यूपीमध्ये या कालावधीत 1,351 नवीन कोरोनाबाधितांची नोंदवली गेली आहेत. जी मागील आठवड्यापेक्षा 23 टक्क्यांची कमी आहे. कोरोनाबाधितांच्या ताज्या आकडेवारीत घट होत असताना, देशातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण गेल्या रविवारी 20,400 इतके होते. 


दरम्यान, या तीन राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. याचाच परिणाम देशाच्या एकूण कोरोनाबाधितांच्या आकड्यावर झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची साप्ताहिक आकडेवारी 13 टक्क्यांनी वाढून 1,562 वर पोहोचली आहे, तर केरळमध्ये गेल्या आठवड्यात जवळपास 3,000 नवीन रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे. तर गुजरात (या आठवड्यात 44 टक्के), आंध्र प्रदेश (44 टक्के), मध्य प्रदेश (31 टक्के) आणि बंगाल (8 टक्के) मध्ये देखील रुग्णांची वाढ झाली आहे. जरी या सर्व राज्यांमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या अजूनही खूपच कमी आहे. कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थान ही राज्ये आहेत. जिथे आठवडाभरात कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :