AAP Convention : आपचे दिल्लीत 'राष्ट्रीय अधिवेशन', भाजपविरोधात करणार शक्तिप्रदर्शन, आमदार खासदारांसह प्रमुख नेते राहणार उपस्थित
आम आदमी पार्टीचे (AAP) आज दिल्लीत 'राष्ट्रीय अधिवेशन' (AAP National convention) होणार आहे. आम आदमी पार्टी आज भाजपविरोधात दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.
AAP National Convention : आम आदमी पार्टीचे (AAP) आज दिल्लीत 'राष्ट्रीय अधिवेशन' (AAP National convention) होणार आहे. आम आदमी पार्टी आज भाजपविरोधात दिल्लीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. आपचे अशा प्रकारचे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनाला आपचे खासदार आमदारांपासून देशाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे.
अरविंद केजरीवाल मार्गदर्शन करणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय जन प्रतिनिधी अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या लोकप्रतिनिधी परिषदेत 20 राज्यातील 1 हजार 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या अधिवेशनात आप भाजपविरोधात मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. ऑपरेशन लोटसच्या मुद्द्यावरुन आपचे नेते भाजपला घेरण्याची शक्यता आहे. तसेच अरविंद केजरीवाल देखील मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचा विस्तार, संघटनेची ताकद यावर केजरीवाल चर्चा करणार आहेत. सकाळी साडे अकरा वाजता केजरीवाल मार्गदर्शन करणार आहेत.
आज देश के लिए ऐतिहासिक दिन है..
— Manish Sisodia (@msisodia) September 18, 2022
AAP के पहले राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन हो रहा है जिसमे पूरे देश से AAP के सभी जनप्रतिनिधि शामिल होंगे
राष्ट्रीय संयोजक @ArvindKejriwal जी सभी का जनता के प्रति अपना कर्तव्य पालन करने व देश को नं.1 बनाने के मिशन को बढ़ाने के लिए मार्गदर्शन करेंगे pic.twitter.com/2y92gll3jg
काय म्हणाले मनीष सिसोदिया?
आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक असल्याचे, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. आपचे हे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले जात असून, त्यात देशभरातील 'आप'चे सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल या सर्वांना आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि देशाला नंबर 1 बनवण्याचे ध्येय वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
आम आदमी पार्टीचे आरोप काय?
आम आदमी पार्टी (AAP) ने आरोप केला आहे की, भाजपला दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार आणि पंजाबमधील भगवंत मान सरकार पाडायचे आहे. त्यामुळं आमदारांना भाजपकडून ऑफर दिली जात आहे. मात्र, या आरोपांबाबत आम आदमी पक्षाकडून कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे भाजप हे आरोप फेटाळून लावत पुराव्याची मागणी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: