'आता भाजप पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवत आहे, आमदारांना 25-25 कोटींची ऑफर', आपचा आरोप
Punjab BJP Operation Lotus: भाजप दिल्ली सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केला होता. हाच आरोप आता पंजाबमधील आप सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी देखील केला आहे.
Punjab BJP Operation Lotus: भाजप दिल्ली सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केला होता. हाच आरोप आता पंजाबमधील आप सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी देखील केला आहे. पंजाबमध्ये भाजपने ऑपरेशन लोटस चालवले असून भाजप आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे हरपाल सिंग चीमा म्हणाले आहेत. अर्थमंत्री चीमा म्हणाले की, भाजप प्रत्येक आप आमदाराला प्रत्येकी 25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे.
याबाबत आप पंजाबने ट्वीट केले आहे की, "सिरियल किलर भाजपने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले आहे. पंजाबमधील आपच्या आमदारांना 25-25 कोटींची ऑफर दिली आहे. पण भाजप हे विसरत आहे की, आम आदमी पक्षाचा एकही आमदार विकला जाणार नाही. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही भाजपची ऑपरेशन अपयशी ठरेल.
हरपाल सिंग चीमा यांनी मंगळवारी चंदीगड येथे भाजपवर आरोप केला की, 'आपचे आमदार विकत घेऊन पंजाबमधील आप सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमधील ऑपरेशन लोटससाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणा, तसेच पैशाचा वापर करत आहे. चीमा म्हणाले की, भाजपने आमच्या आमदारांना पक्षापासून वेगळे होण्यासाठी 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. एवढेच नाही तर भाजपने या आमदारांना मोठ्या पदाचे आमिषही दिले आहे. यासोबतच तुम्हाला आणखी आमदार मिळाल्यास 75 कोटी रुपये दिले जातील, असे सांगितले.
Serial Killer BJP अब पंजाब में अपना Operation Lotus लेकर आ गई है।
— AAP Punjab (@AAPPunjab) September 13, 2022
Punjab में AAP के MLAs को ₹25-25 crore के offer दे रही है।
लेकिन BJP भूल रही है कि आम आदमी पार्टी का एक भी विधायक बिकाऊ नहीं है। दिल्ली की तरह पंजाब में भी BJP का Operation Fail होगा।
- @HarpalCheemaMLA pic.twitter.com/45h9RD3e1i
आपच्या सुमारे 10 आमदारांशी संपर्क साधला
भाजपवर आरोप करताना हरपाल सिंग चीमा म्हणाले की, भाजप नेते आप आमदारांना सांगत आहेत की, सरकार पाडण्यासाठी त्यांना फक्त 35 आमदारांची गरज आहे. काँग्रेसचे आमदार त्यांच्या संपर्कात असल्याने ते असे बोलत आहेत. चीमा म्हणाले की, भाजपने पंजाबमधील सात ते 10 आप आमदारांशी संपर्क साधला आहे. परंतु चीमा यांनी या आमदारांची नावे जाहीर केली नाहीत.