एक्स्प्लोर

मोदींचा मित्र पाकिस्तानने मसूद, दाऊद आणि हफिजला भारताकडे सोपवावं : दिग्विजय सिंह

पुलवामा हल्ल्याच्या 64 दिवसांनंतर या हल्ल्यामागचा सुत्रधार असलेल्या मसूद अजहरला वाचवणारी चीनची भिंत ढासळलेली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.

भोपाळ : पुलवामा हल्ल्याच्या 64 दिवसांनंतर या हल्ल्यामागचा सुत्रधार असलेल्या मसूद अजहरला वाचवणारी चीनची भिंत ढासळलेली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. या घटनेनंतर देशात विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नरेंद्र मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे आता मोदींच्या या मित्राने दाऊद इब्राहिम, मसूद अजहर आणि हफीज सईदला त्वरीत भारताच्या ताब्यात द्यायला हवं. दिग्विजय सिंह म्हणाले की, घोषणा करुन काय होणार आहे? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मोदींसोबतची दोस्ती निभावण्यासाठी दाऊद इब्राहिम, मसूद अजहर आणि हफिज सईदला त्वरीत भारताकडे सोपवायला हवं. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ याबाबत म्हणाले की, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे, हे चांगलंच झालं. परंतु हे खूप अगोदर व्हायला हवं होतं. खूप दिवसांपासून हे ठरलं होतं. अखेर भारतात निवडणुकीच्या दरम्यान हे काम झालं. या घटनेचा निवडणुकीशी काही संबंध आहे की नाही हे मात्र मला माहीत नाही. काल (बुधवार, 1 मे ) संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझहरचा समावेश केला. पुलवाला हल्ला आणि भारतविरोधी अनेक कारवायांमध्ये मसूद अझहरची महत्त्वाची भूमिका आहे. मसूद अझहरला चीनचं नेहमीच समर्थन मिळत होतं, मात्र यावेळी चीनने नरमाईची भूमिका घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget