एक्स्प्लोर

भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे, तंत्रज्ञान मानवाच्या सेवेसाठी असावं : नरेंद्र मोदी 

Narendra Modi : देशाची राजधानी नवी दिल्लीत इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला मुलाखत दिली आहे.    

Narendra Modi on AI Revoulation नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या निमित्तानं तंत्रज्ञान आणि एआय संदर्भात एक मुलाखत दिली आहे. एएनआय  या वृत्तसंस्थेनं नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मोदी यांनी तंत्रज्ञान हे मनुष्य सेवेसाठी असावं, माणसांची जागा घेण्यासाठी नव्हे, असं म्हटलं. जागतिक विकासाला मानवकेंद्री ठेवत एआयनं प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी म्हटलं.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी एआय संदर्भात बोलताना म्हणाले की तंत्रज्ञानाचं अस्तित्व माणसांच्या सेवेसाठी असावं त्यांची जागा घेण्यासाठी नसावं.  आमचं व्हिजन स्पष्ट आहे, जागतिक विकासाला एआयनं प्रोत्साहन देताना सखोलपणे मानवकेंद्री असलं पाहिजे.  आम्ही फक्त टॅलेंट विकसित करत नसून इन्फ्रास्ट्रक्चर, धोरण यंत्रणा आणि  एआय क्रांतीत भारतानं सहभागी व्हाव यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर काम करतोय, असं मोदी म्हणाले.

एआय सुपरपॉवरमध्ये भारत असावा 

मोदी पुढं म्हणाले की, आम्हाला आयटी क्षेत्र फक्त सेवा क्षेत्रात नकोय त्यांनी एआय उत्पादनं, एआय प्लॅटफॉर्मसाठी काम करावं, ज्यानं भारत आणि जगाला सोल्यूशन्स मिळतील, असं मोदींनी सांगितलं. माझ्या मते एआय हे ऊर्जा कित्येक पटीनं वाढवणारं असेल ज्यामुळं जितक्या सीमा किंवा मर्यादा असतील त्या दूर करता येतील.  माझ्या व्हिजन नुसार भारत जगातील तीन प्रमुख एआय सुपरपॉवर्समध्ये असावा. तो देखील एआयच्या वपारतात नाही तर एआयच्या निर्मितीत, असं मोदींनी म्हटलं.  आपल्या एआय मॉडेलचा वापर जगभरात झाला पाहिजे, अब्जावधी लोकांनी त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये वापर करावा. आपल्या एआय स्टार्टअपचं मूल्य शेकडो अब्ज असेल, ज्यातून दशलक्ष नोकऱ्या उपलब्ध होतील, असंही मोदींनी म्हटलं.  

डिजिटल शतकात आत्मनिर्मभर भारत म्हणजे एआय मध्ये भारतानं आपला स्वत: चा कोड लिहायला हवा. इंडिया एआय मिशन द्वारे आपल्या कोडमधून आपणं आपली मूल्य, आपल्या लोकांची सेवा करु याशिवाय जबाबदार एआय नेतृत्त्व म्हणून जगात भारताचं स्थान असेल. आपलं ध्येय स्पष्ट आहे. मनुष्य केंद्रीत जागतिक विकासाला एआयनं गती दिली पाहिजे, असं मोदी म्हणाले.  

जगभरात एआयमुळं दरी वाढण्याची भीती असताना  भारत मात्र एआयच्या वापरानं ती दरी कमी करण्याचं काम करेल, असं मोदींनी म्हटलं. भारताकडे बुद्धिमत्ता असून उद्योजकीय ऊर्जा असून त्याद्वारे एआय पॉवरहाऊस होण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आपण एआयचे ग्राहक नाही तर निर्माते असू असं मोदी म्हणाले.  

आपल्या प्रत्येक प्रयत्नातून आपल्या बुद्धिमान तरुणांनी एआयचा वापर ऊर्जेचा त्यांच्या शक्तीची क्षमता वाढवण्यासाठी करावा. ज्यामध्ये नाविन्यता आणि सर्वसमावेशकता असावी, असं मोदी म्हणाले. एआयमुळं मानवी क्षमता वाढतील. मानवकेंद्रीत निर्णय घेण्याची जबाबदारी देखील वाढेल, असं मोदींनी म्हटलं. एआयमधील सर्वसामान्य मूल्य आणि दर्जा सांभाळण्यासाठी जगानं एकत्र काम केलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.  

तंत्रज्ञानामुळं काम पुसलं जाऊ नये. त्याचं स्वरुप बदललं जाईल आणि नव्या नोकऱ्या निर्माण होतील, असंही मोदींनी म्हटलं. इतिहासानं आपल्याला शिकवलं आहे, जेव्हा नाविन्यता निर्माण होते, नव्या संधी निर्माण होतात. एआयच्या जगात देखील तेच सत्य आहे. एआय संदर्भात आत्मनिर्भर भारताचा विचार केला असता तीन स्तंभ महत्त्वाचे आहेत. सार्वभौमत्व, सर्वसमावेशकता आणि नाविन्यता असं मोदींनी म्हलं.  एआय मध्ये आत्मनिर्भर भारत म्हणजे डिजिटल शतकात भारतानं स्वत:चा कोड लिहिणं होय, असं मोदी म्हणाले.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget