मोदींची सेंच्युरी | पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील सर्वात प्रभावशाली पंतप्रधान- सर्व्हे
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात प्रभावशाली पंतप्रधान असल्याचं एबीपी न्यूज आणि सी वोटरने केलेल्या सर्व्हेतून समोर आलं आहे. 66.7 टक्के लोकांना नरेंद्र मोदी सर्वात प्रभावशाली पंतप्रधान वाटतात.
मुंबई : मोदी सरकारने आपल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले. तीन तलाक आणि कलम 370 अशा मोठ्या निर्णयांचा यामध्ये समावेश आहे. या निर्णयांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाची झलक पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 दिवसांच्या कार्यकाळानंतर एबीपी न्यूज आणि सी वोटरने एका सर्वेतून जनतेची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात प्रभावशाली पंतप्रधान असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटरने ऑगस्ट महिन्यात 11 हजार 308 लोकांचा हा सर्व्हे केला. स्वतंत्र भारतातील सर्वात प्रभावशाली पंतप्रधान कोण? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कौल देत, 66.7 टक्के लोकांना नरेंद्र मोदी सर्वात प्रभावशाली पंतप्रधान वाटतात.
भारतातील सर्वात प्रभावशाली पंतप्रधान कोण ?जवाहरलाल नेहरू- 7.7 इंदिरा गांधी - 10.1 अटलबिहारी वाजपेयी - 9.7 नरेंद्र मोदी - 66.7 माहित नाही/ सांगता येत नाही - 6.2
----------------------------------------------------------
मोदी सरकारच्या काळातील सर्वात मोठं यश कोणतं?
कलम 370 - 54.2 तीन तलाक - 5.8 दहशतविरोधी कायदा - 21.7 मोटर वाहन कायदा - 4.1 कोणतेच नाही - 2.0 माहित नाही/सांगता येत नाही - 12.2