एक्स्प्लोर

रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील खतांच्या किमतीत वाढ, शेतकऱ्यांना सर्वाधिक अनुदान दिलं; मोदी सरकारचा दावा

देशातील खतांच्या वाढत्या किमतीचा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात 2.25 लाख कोटी रुपयांचे अनुदान दिलं आहे. 

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याचा परिणाम भारतासारख्या अनेक देशांच्या आयात खर्चावर झाल्याचं दिसतंय. खतांच्या वाढत्या किमतीमुळे सप्लाय चेनवर परिणाम होत असल्याचंही दिसंतय. असं असलं तरी केंद्र सरकारने दिलेल्या मोठ्या अनुदानामुळे भारतीय शेतकऱ्यांना मात्र त्याचा कोणताही फटका बसला नसल्याचा दावा करण्यात येतोय.

रशिया हा देश नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरसचा महत्त्वाचा निर्यातदार देश असल्याने युद्धामुळे त्याचा परिणाम भारतासारख्या देशांवर होत आहे. असं असलं तरी केंद्र सरकारने देशातील खतांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला असून जागतिक स्तरावर खतांच्या वाढत्या किमतीचा फटका शेतकऱ्यांना बसला नाही. 

भारत हा खतांचा एक मोठा आयातदार देश आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या किंमत वाढीवर झाल्याचं दिसतंय. त्यामुळे त्याचा परिणाम हा कृषी उत्पादनावरही होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर अपेक्षित पाऊलं उचलली आहेत.

खतांवर विक्रमी अनुदान 

खतांच्या किमतीच्या वाढीचा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2022-23 या वर्षामध्ये विक्रमी 2.25 लाख कोटी रुपयांचे अनुदान दिलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या खतांच्या किमतीचा परिणाम हा देशातील शेतकऱ्यांवर झाला नाही. शेतकऱ्यांना किफायतशीर किमतीत खतांची उपलब्धता झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनही स्थिर राहण्यास मदत झाली.

केंद्र सरकार नॅनो खतासाठी देणार 50 टक्के अनुदान

रासायनिक किटकनाशके तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीचा पोत बिघडतो. अशा प्रकारच्या खतांमुळे मृदा, हवा तसेच पाणी प्रदूषण होण्याची शक्यता असते. हीच शक्यता कमी करण्यासाठी सरकारकडून नॅनो खतांचा पुरस्कार केला जात आहे. 

रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खतांचा वापर वाढवायला हवा, असे शेती क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने नॅनो खतांबाबब मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना ही खते स्वस्तात मिळावीत म्हणून केंद्र सरकारकडून नॅनो खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूसच, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूसच, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
एबीपी इम्पॅक्ट, पश्चिम रेल्वे स्थानकावरील घाणीचं साम्राज्य व्हायरल; रेल्वे प्रशासनाकडून काम, लोखंडांचे मोठे कुंपण
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
Embed widget