एक्स्प्लोर

Mulayam Singh Yadav funeral : मुलायम सिंग यादव यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार, पंतप्रधान उपस्थित राहण्यावर चर्चा

Mulayam Singh Yadav funeral :मुलायम सिंह यादव बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. यूपीमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Mulayam Singh Yadav funeral : समाजवादी पार्टीचे मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh Yadav Passed Away) यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी सैफई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. यूपीमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मोठे नेते अंत्यदर्शनासाठी पोहोचणार

आज सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता अखिलेश यादव यांच्या चितेला अग्नि देणार आहे. मुलायम यांच्या अंतिम दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मोठे नेते सैफईला पोहोचणार आहेत. मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मभूमीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राहुल आणि प्रियंका गांधी 'भारत जोडो यात्रा' थांबवणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्यांची 'भारत जोडो यात्रा' एक दिवस थांबवून आज सैफई गावात पोहोचू शकतात. सैफईला पोहोचल्यानंतर ते मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतील आणि नंतर अंत्यसंस्कारांना उपस्थित राहतील. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश आज सैफईला पोहोचू शकतात.

'हे' नेते उपस्थित राहण्याची शक्यता

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आज सैफई गावाला भेट देऊन मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस केसी त्यागी, केंद्रीय मंत्री एसपी बघेल, रामशंकर कथेरिया, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला आज सैफई गावात पोहोचू शकतात. आज मुलायम सिंह यांच्या श्रद्धांजली समारंभाला त्यांच्याशिवाय देशातील इतर नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर

आपल्या दिवंगत नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सपाचे हजारो कार्यकर्ते सैफई गावात जमले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांना सैफई गावात पाचारण करण्यात आले आहे. मुलायमसिंह यादव यांच्या चाहत्यांना आज सकाळी 10 वाजल्यानंतर त्यांचे पार्थिव पाहता येणार आहे. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर योगी सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत राज्यात कोणताही राज्य कार्यक्रम होणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Parliament Session  : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh  यांचं भाषणRajya Sabha Parliament : राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ,खरगेंच्या पोस्टवरून गदारोळSunanda Pawar On Sharad Pawar :दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; सुनंदा पवार यांचं वक्तव्य #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Embed widget