एक्स्प्लोर

Russia Ukraine War : 'यूक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करा', महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे निर्देश

Russia Ukraine War : यूक्रेनमधील मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिले आहेत.

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता यूक्रेनमधील मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) दिले आहेत. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसने (MUHS) युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि राज्यात मायदेशी परतणाऱ्या विद्यार्थ्यांचा तपशील मागवणारे परिपत्रक जारी केले.

दरम्यान, यावर अनेक विद्यार्थ्यांनी अशी माहिती संकलित करण्यामागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर केवळ माहिती एकत्र करण्यासाठी हा डेटा मागवला जात असल्याचं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने म्हटले आहे. युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील किती विद्यार्थी शिकत आहेत याच्या नोंदी अद्ययावत करण्याचा हा अभ्यास असल्याचा दावा एमयूएचएसने (MUHS) केला आहे.

एमयूएचएसचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी बुधवारी परिपत्रक जारी केले आहे. त्यांनी सांगितले की हे केवळ युक्रेनमधील मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा डेटा एकत्र करण्यासाठी आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी एका भाषणात सांगितले होते की, युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरती मदत देण्याचे मार्ग राज्य सरकार पाहत आहे. या विधानामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला होता की सरकार परत आलेल्या विद्यार्थ्यांना राज्य महाविद्यालयांमध्ये सामावून घेईल.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना अशाप्रकारे दिलासा मिळण्याच्या शक्यतेने इतर देशांत शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. एका विद्यार्थ्याने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याची विद्यापिठाची योजना नेमकी कशी आहे याबद्दल अधिक तपशील देणे गरजेच आहे. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी कोविड-19 महामारीच्या काळात भारतात परतले होते आणि तेव्हापासून ते येथेच अडकून पडले आहेत. जर सरकारने मदतीचा हात पुढे केला तर तो सर्वांसाठी असावा.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

NCP Ajit Pawar: राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Embed widget