एक्स्प्लोर
प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना सभागृहात हसू अनावर का झालं?
लोकसभेच्या सभागृहात कधी कधी अनेक किस्से, गमतीदार प्रसंग घडत असतात. सध्या सभागृहातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा हा व्हिडिओ आहे.
नवी दिल्ली : लोकसभेच्या सभागृहात कधी कधी अनेक किस्से, गमतीदार प्रसंग घडत असतात. सध्या सभागृहातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्राच्याच भाजप खासदार भारती पवार एका विषयावर मराठीत बोलताना या व्हिडिओत दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्या मागे बसलेल्या या दोन महिला खासदार हसताना दिसत आहेत. नंतर हे हसू अनावर झाल्याने दोघीही डेस्कखाली लपवण्याचा प्रयत्न करतानाही त्या दिसतात. या दोघींना हसू अनावर काय झालंय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
या व्हिडिओच्या क्लीपवर 16 जुलैची तारीख पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दिवशी लोकसभेत अर्थसंकल्पावर विविध अनुदानांच्या बाबतीत जी चर्चा सुरु होती, त्यावर भारती पवार बोलत होत्या. भारती पवार पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. तर प्रीतम मुंडे, रक्षा खडसे या दोघीही दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. तीनही भाजपच्याच खासदार आहेत हे विशेष. असं काय घडलं होतं, ज्यामुळे या दोन महिला खासदारांना हसू अनावर झालं? याचं उत्तर मात्र अजून कळलेलं नाही.
व्हिडीओ पाहा
याबाबत खासदार प्रीतम मुंडे यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा विषय आपल्याला वाढवायचा नाही, असे सांगत मुंडे यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement