MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
MP Prajwal Revanna : कर्नाटकातील जनता दलाचे Janata Dal (Secular) खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना (MP Prajwal Revanna) यांच्यावर शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. भर लोकसभा निवडणुकीत या घटनेनंतर खळबळ उडाली असून कर्नाटक सरकारने एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली आहे. दुसरीकडे, प्रज्वल रेवन्ना यांनी व्हायरल व्हिडिओमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्यांनीही तक्रार दाखल केल्याची चर्चा सुरु असतानाच आता देश सोडून जर्मनीला पळाल्याची चर्चा आहे.
रेवन्ना हसन लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार
रेवन्ना हे माजी पंतप्रधान आणि JD(S) प्रमुख एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. रेवन्ना हसन लोकसभा मतदारसंघातून विद्यमान JD(S) खासदार आहेत.
प्रज्वलवर काय आरोप आहे?
अश्लील व्हिडिओंनी भरलेल्या पेन ड्राईव्हमधून हा प्रकार समोर आला आहे. खासदार आणि एनडीएचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांनी शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच आरोप आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी प्रज्वल यांच्यावरील आरोपांबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले होते. यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहेत, अशी दृश्ये हसन जिल्ह्यात पेन ड्राइव्हद्वारे व्हायरल केली जात आहेत. व्हिडिओमध्ये प्रज्वल रेवन्ना अनेक महिलांसोबत दिसून येत आहे.
चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय
वाद वाढल्यानंतर तक्रारीची दखल घेत कर्नाटक सरकारने खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा समावेश असलेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विटवर एका पोस्टमध्ये सांगितले की, "सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडीओ क्लिप फिरत आहेत, जिथे महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते, असे मुख्यमंत्री म्हणाले. 'अश्लील व्हिडिओ' प्रकरणी सीआयडी विंग एसआयटीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी विजय कुमार सिंह करणार आहेत. महासंचालक सीआयडी सुमन डी पेन्नेकर आणि आयपीएस अधिकारी सीमा लाटकर टीमचे सदस्य असतील.
एचडी कुमारस्वामी वादावर काय म्हणाले?
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले, "मी असो किंवा एचडी देवेगौडा, आम्ही नेहमीच महिलांचा आदर करतो आणि जेव्हा जेव्हा त्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच एसआयटीचे आदेश दिले आहेत. तपास आणि एसआयटी तपास सुरू झाला आहे... एसआयटी टीम त्याला परदेशातून परत आणेल ही माझी चिंता नाही. भाजपने या वादापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या