एक्स्प्लोर

MP Bus Accident: मध्यप्रदेशात भीषण अपघात, बस कालव्यात कोसळली, 30 मृतदेह हाती, बचावकार्य सुरु

MP bus accident: मध्य प्रदेशमध्ये सिधी जिल्ह्यात रिवा-सिधी बॉर्डरच्या जवळ एक अपघात झाला आहे. 54 प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळल्याने 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं असून अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि मदत करण्याबाबत आदेश दिले आहेत.

MP bus accident:  मध्य प्रदेशमध्ये सिधी जिल्ह्यात रिवा-सिधी बॉर्डरच्या जवळ एक अपघात झाला आहे. 54 प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळल्याने 30 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात एएनआयनं देखील वृत्त दिलं आहे. या अपघातात काही जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं असून अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं असून अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि मदत करण्याबाबत आदेश दिले आहेत.

या बसमध्ये जवळपास 50 प्रवाशी होते. प्रवाशांनी भरलेली बस ही सिद्धी येथील एका खोल कालव्यात कोसळली. सिद्धी येथून सतनाच्या दिशेने बस जात असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आलं. या बसमधील 39 प्रवाशांनी तिकीट बुक केलं होतं. त्यानंतर रस्त्यात आणखी काही प्रवाशी बसमध्ये बसले, अशी माहिती आहे.

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कालव्याचं पाणी बंद केल्यानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर बस दिसून आली. या अपघातात अजून काही जणांचा मृत्यू झालेला असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेनं मन व्यथित या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुख व्यक्त केलं असून अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि मदत करण्याबाबत आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, या दुर्भाग्यपूर्ण घटनेसंदर्भात माहिती घेत मी सतत प्रशासन आणि बचावकार्यात सहभागी लोकांच्या संपर्कात आहे. ही घटना फार दुखद आहे. मन व्यथित झालं आहे. बचावकार्य सुरु असून जिल्हाधिकारी, कमिश्नर, आयजी, एसपी आणि एसडीआरएफ टीम घटनास्थळावर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDhananjay Munde: सरकारने दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या?आरोपांवरुन संतापले, म्हणाले..Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोपIndrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Embed widget