देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
न भूतो न भविष्यति; 21 ते 23 जानेवारी दरम्यान होणार अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पंतप्रधान मोदींना पाठवलं निमंत्रण
अयोध्येतील राम मंदिराचं (Ayodhya Ram Temple) बांधकाम वेगानं सुरू आहे. अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख समोर आली आहे. पुढील वर्षी 21 ते 23 जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. (वाचा सविस्तर)
चांद्रयान-3 चं चंद्राच्या दिशेने दोन तृतीयांश अंतर पार; आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार
भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष आता इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) ने 14 जुलै रोजी सोडलेल्या ‘चांद्रयान-3’ने (Chandrayaan-3) आतापर्यंत चंद्राच्या दिशेने दोन तृतीयांश अंतर पार केलं आहे. त्यानुसार, आज (5 ऑगस्ट) रोजी संध्याकाळी 7 वाजता हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे अशी माहिती इस्रोने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. (वाचा सविस्तर)
हे निर्बंध तडकाफडकी नाहीत, आयातदारांना पुरेसा वेळ दिला जाणार', लॅपटॅाप आयातीवरील निर्बंधाबाबत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर याचं स्पष्टीकरण
निर्बंध काही लगेच घालण्यात येणार नाहीत, त्यासाठी आयातदारांना पुरेसा वेळ देण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrashekhar) यांनी दिलं आहे. केंद्र सरकारने लॅपटॉप (Laptop) आणि कॉम्प्युटरच्या (Computer) आयातीवर (Imports) निर्बंध आणल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हाच संभ्रम दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे (वाचा सविस्तर)
कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद; लष्कराची शोध मोहीम सुरूच
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन सुरक्षा जवान शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याच्या माहितीवरून लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती, ज्यामध्ये कुलगाम पोलिसांचाही सहभाग होता. (वाचा सविस्तर)
भाषांनी देशाला एकसंध ठेवण्याचे काम केलं, स्थानिक भाषांना सन्मान दिला तरच राजभाषेचा स्वीकार होईल : अमित शाह
सर्व भाषांनी आपला देश जोडण्याचे काम केलं आहे. भाषांनी देश एकसंध ठेवल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांनी केलं. गुलामगिरीच्या काळातही भारतीय भाषा आणि त्यांचे शब्दकोश अबाधित राहिले, ही मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. (वाचा सविस्तर)
साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ, देशात मात्र साखरेचे किरकोळ दर स्थिर : केंद्र सरकार
साखरेच्या (Sugar) आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ होऊनही देशातील साखरेचे किरकोळ दर स्थिर ठेवल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. एप्रिल ते मे 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमतींनी दशकातील सर्वोच्च पातळी गाठली होती. तरीही, साखरेच्या देशांतर्गत किमतींमध्ये सुमारे 3 टक्के इतकी नाममात्र दरवाढ झाली आहे. (वाचा सविस्तर)
वृषभ, मकर, मीनसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभाची संधी; वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. तूळ राशीच्या लोकांनी नवीन वाहन घेण्याचा विचार ताप्तुरता थांबवावा. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ नाही. एकूणच, मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार नेमका कसा असेल? (वाचा सविस्तर)
जगातला पहिला ट्राफिक सिग्नल अमेरिकेत सुरू, राम मंदिराची पायाभरणी, काश्मीरचे 370 कलम हटवलं; आज इतिहासात
रस्त्यावरून चालताना तुम्ही ठिकठिकाणी ट्रॅफिक सिग्नल पाहिले असतील. ते कधी सुरू झाले हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल. खरं तर, अमेरिकेमध्ये 5 ऑगस्ट 1914 मध्ये पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक लाईट बसवण्यात आला होता आणि त्यावेळी त्यात फक्त हिरवा दिवा आणि लाल दिवा होता. लाल लाईट लागला तर एकाने उे राहायचे आणि दुसऱ्याने चालायचे होते. नंतर त्यात तिसरा पिवळा सावध दिवाही बसवण्यात आला. 5 ऑगस्ट रोजी भारतातही सलग दोन मोठ्या घटनांची नोंद झाली. (वाचा सविस्तर)