Amit shah : सर्व भाषांनी आपला देश जोडण्याचे काम केलं आहे. भाषांनी देश एकसंध ठेवल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांनी केलं. गुलामगिरीच्या काळातही भारतीय भाषा आणि त्यांचे शब्दकोश अबाधित राहिले, ही मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संसदेच्या राजभाषा समितीची 38 वी बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींना सादर केल्या जाणाऱ्या संसदेच्या राजभाषा समितीच्या अहवालाच्या बाराव्या खंडालाही मान्यता देण्यात आली आहे.
गुलामगिरीच्या काळातही भारतीय भाषा अबाधित
हिंदीची स्थानिक भाषांशी स्पर्धा नाही. सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देऊनच राष्ट्र सक्षम होईल असं वक्तव्यही अमित शाह यांनी केलं. सर्व भाषांनी आपला देश जोडण्याचे केले काम केलं. गुलामगिरीच्या काळातही भारतीय भाषा आणि त्यांचे शब्दकोश अबाधित राहिल्याचे शाह म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर 'पंचप्रण' ठेवले आहेत. त्यापैकी दोन प्रण (संकल्प) आहेत. एक वारशाचा आदर करणे आणि दुसरे गुलामगिरीची चिन्हे पुसून टाकणे, असे शाह म्हणाले. या दोन प्रणांच्या 100 टक्के अंमलबजावणीसाठी सर्व भारतीय भाषा आणि राजभाषा यांनी त्यांची ताकद दाखवायला हवी असेही मंत्री शाह यांनी यावेळी सांगितलं.
स्थानिक भाषांना सन्मान दिला तरच राजभाषेचा स्वीकार
भाषेचा आदर केल्याशिवाय वारशाचा आदर अपूर्ण आहे. स्थानिक भाषांना सन्मान दिला तरच राजभाषेचा स्वीकार होईल, असेही अमित शाह म्हणाले. हिंदी भाषेची स्थानिक भाषांशी स्पर्धा नाही. सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देऊनच राष्ट्र सशक्त होईल, असे अमित शाह यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 भाषांमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच हे अभ्यासक्रम सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होतील आणि तो क्षण स्थानिक भाषा आणि राजभाषेच्या उदयाची नांदी ठरेल असेही शाह म्हणाले. पंतप्रधान मोदींनी संसदेत एकही भाषण इंग्रजीत केले नाही. सरकारचे मंत्री देखील भारतीय भाषांमध्ये भाषण देण्याचा प्रयत्न करतात. यामुळं विविध भाषा जोडण्याच्या चळवळीला खूप चालना मिळते, असे शाह यांनी सांगितलं.
गुलामगिरीच्या कालखंडानंतरही भारतीय भाषा आणि त्यांचे शब्दकोश अबाधित राहिले, ही मोठी उपलब्धी आहे. भाषांनी देशाला एकसंध ठेवण्याचे काम केल्याचे शाह यांनी सांगितलं. दरम्यान, या बैठकीला राजभाषा संसदीय समितीचे उपाध्यक्ष भर्तृहरी महताब, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा आणि निशीथ प्रामाणिक आणि समितीचे सदस्य या बैठकीत उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: