नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराचं (Ayodhya Ram Temple) बांधकाम वेगानं सुरू आहे. अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची  तारीख समोर  आली आहे.   पुढील वर्षी 21 ते 23 जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरातील गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.  श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रस्टतर्फे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच त्यांची  वेळ देखील मागितली आहे, ही माहिती राम मंदिर प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी ही माहिची दिली हे. 


अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना ही  पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 21,22 आणि 23 जानेवारी या तीन तारखा निश्चित करण्यात आल्या आहे, अशी माहिती  श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.


25000 संताना आमंत्रित करण्यात येणार


अयोध्येत हा सोहळा पार पडणर असून संपूर्ण सोहळा अराजकीय असणार  आहे. या सोहळ्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात येणर आहे.   याशिवाय त्या कार्यक्रमासाठी कोणताही स्टेज बनवला जाणार नाही. या सोहळ्यासाठी 25000 संताना आमंत्रित करण्याचे नियोजन असल्याची माहिती राय यांनी दिली. राय पुढे म्हणाले, "सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणाऱ्यांची यादी बनवण्यात आली असून लवकरच श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची स्वाक्षरी असणाऱ्या निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार आहे.ट्रस्टने अयोध्येतील मोठ्या मठांमध्ये सर्व प्रमुख संतांना निमंत्रीत करण्याची योजना आखली आहे. या  25000 संत 10000 खास पाहुण्यांपेक्षा वेगळे असतील जे रामजन्मभूमीच्या आवारात होणाऱ्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहतील.


जानेवारी महिन्यात भाविकांना महिनाभर मोफत भोजन


अयोध्येतील अभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना महिनाभर मोफत भोजन देण्याची ट्रस्टची योजना आहे. राय यांच्या म्हणण्यानुसार, ट्रस्ट संपूर्ण जानेवारीमध्ये दररोज 75,000-1,00,000 भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार  आहे. राम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे देशभरात प्रक्षेपण करण्याचीही तयारी सुरू आहे, जेणेकरून लोकांना हा ऐतिहासिक क्षण त्यांच्या गावातून, शहरातून आणि इतर ठिकाणांहून पाहता येईल.


दरम्यान, या वर्षी डिसेंबरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ट्रस्टने कामगार आणि तंत्रज्ञांची संख्या वाढवली आहे. आता वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चोवीस तास बांधकाम सुरू आहे. राम मंदिर संकुलात आधी 550 कर्मचारी काम करत होते, मात्र गेल्या काही आठवड्यात ट्रस्टने ही संख्या जवळपास 1600 पर्यंत वाढवली आहे.  ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधानांनी राम मंदिराचे 'भूमिपूजन'केले होते. 


हे ही वाचा :


Ayodhya Ram Mandir : भाजपला 'श्रीराम' पावणार का? अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या तारखेचा संबंध लोकसभेच्या निवडणुकीशी?