Rajeev chandrashekhar on  Import of Laptops Tablets And Personal Computers: निर्बंध काही लगेच घालण्यात येणार नाहीत, त्यासाठी आयातदारांना पुरेसा वेळ देण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrashekhar) यांनी दिलं आहे.  केंद्र सरकारने लॅपटॉप (Laptop) आणि कॉम्प्युटरच्या (Computer) आयातीवर (Imports) निर्बंध आणल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हाच संभ्रम दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, या वस्तू देशांतर्गत बनवण्यावर भर देण्यासाठी आणि अशा वस्तूंची आयात कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या उत्पादनावर भर देण्यासाठी यामुळे मदत होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 






सोशल मीडियावर राजीव चंद्रशेखर यांचं उत्तर


सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक सवाल उपस्थित केले जात होते. तसेच अनेक टीका टीप्पणी केली जात होती. या सगळ्या गोष्टीवर सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, देशातील इलेक्ट्रॉनिक गोष्टींच्या उत्पादनावर भर देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच यामुळे देशातील अनेक क्षेत्रांना या निर्णयामुळे मदत होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 






केंद्र सरकारने लॅपटॉप (Laptop) आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया यावर उमटू लागल्या आहेत. त्यातच आता राजीव चंद्रशेखर यांनी केलेल्या स्पष्टीकरणामुळे नागरिकांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून या वस्तूंच्या आयातीसाठी काही नियम घालण्यात आले आहे. यामध्ये केंद्राकडून सांगण्यात आलं आहे की, आता आयात केलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स विकता येणार नाहीत. तसेच आयात केलेली वस्तू ही वापरुन नष्ट करावी किंवा ती पुन्हा निर्यात करावी अशी अटही यामध्ये घालण्यात आली आहे. 


हेही वाचा : 


केंद्र सरकारकडून लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध; 'मेक इन इंडिया'चा आग्रह