देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे काल (21 जुलै) दहाच्या सुमारास अचानक मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही. मुख्यमंत्री शिंदे वैयक्तिक कामासाठी दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी तिथे जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची (BJP Leaders) भेट घेणार आहेत. परंतु त्यांच्या या दौऱ्यामागचं मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वाचा सविस्तर


देशातील विविध राज्यात आज वादळी पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज


देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच काही भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील घडल्याआहेत. विशेषत: उत्तर भारतात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. वाचा सविस्तर


'तुम्ही अपयशी मुख्यमंत्री आहात', अमित मालवीय यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल


मणिपूरमधील व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशातील प्रत्येक कोपऱ्यातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. यावर भाजपचे नेते अमीत मालवीय यांनी देखील ट्वीट करत उत्तर दिलं आहे. अमित मालवीय यांनी ट्वीट करत पश्चिम बंगालमध्ये पंचायत समितीमध्ये झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. तसेच तुम्हाला लाज वाटते का असा सवाल विचारत त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर


आज देशभरात 44 ठिकाणी रोजगार मेळावे, पंतप्रधान मोदी 70000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार 


आज (22 जुलै) देशभरात 44 ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. केंद्र सरकारच्या विभागांबरोबरच या उपक्रमाला पाठिंबा देणारी राज्य सरकारे तसंच केंद्रशासित प्रदेश यांच्या नियुक्त्यांचा देखील यात समवेश  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी 10.30 वाजता रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये भरती केलेल्या 70,000 पेक्षा नवीन उमेदवारांना दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे वाटणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान उमेदवारांना संबोधित देखील करणार आहेत. वाचा सविस्तर


गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 254 कोटी रुपये खर्च, सरकारची राज्यसभेत माहिती


गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या परदेश दौऱ्यांवर (Foreign Visit) 254.7 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सरकारने बुधवारी राज्यसभेत ही माहिती दिली. राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी  सांगितलं की, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदींनी केलेल्या परदेश प्रवासावर एकूण 2,54,87,01,373 रुपये खर्च झाले आहेत. वाचा सविस्तर


ATS चौकशीपासून ते वयातील वेगवेगळ्या फेरफारपर्यंतच्या आरोपांवर सीमा हैदर काय म्हणाली? 


पाकिस्तानातून प्रेमासाठी भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) सध्या खूप चर्चेत आहे. सीमा PUBG गेम खेळत असताना भारतातील सचिन मीना नावाच्या मुलाच्या प्रेमात इतकी पडली की तिने आपल्या पतीला सोडून चारही मुलांसह आपल्या देशाची सीमा ओलांडली. सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली. त्यानंतर सचिनबरोबर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहू लागली. स्थानिक पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर यूपी एटीएसच्या टीमला बोलावून अनेक प्रश्न विचारण्यात आले. या संदर्भात एबीपी न्यूजने सीमाशी संवाद साधला आणि काही प्रश्नांबाबत चर्चाही केली. वाचा सविस्तर


आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचं राशीभविष्य


आज शनिवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तर तूळ राशीच्या बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज कुंभ राशीला सावध राहण्याची गरज आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर


22nd July In History: राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंग्याचा स्वीकार, गायक मुकेश यांचा जन्म; आज इतिहासात


चार वर्षांपूर्वी, जुलैमध्येच चंद्राच्या अस्पर्शित पैलूंचा शोध घेण्यासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून चांद्रयान-2 प्रक्षेपित करण्यात आले होते. 'बाहुबली' GSLV-मार्क नावाचे सर्वात शक्तिशाली आणि प्रचंड रॉकेट 22 जुलै 2019 रोजी लाँच करण्यात आलं. देशाच्या अवकाश इतिहासातील एक मोठी उपलब्धी म्हणून याकडे पाहिले जात होते.  22 जुलै 1947 रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये संविधान सभेच्या सदस्यांच्या बैठकीत तिरंगा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला होता. वाचा सविस्तर