Mumbai Rain : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचत आहे. यामुळं वाहतुकीवरही परिणाम होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या इशाऱ्यानंतर दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुंबईचा अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरले आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 


पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या अंधेरी सबवे खाली पूर्णपणे पाणी भरलं आहे. हा भाग सखल असल्यामुळं इथं पाणी भरलं आहे. त्यामुळं वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बाहेर मोठ्या संख्येमध्ये पोलीस आणि पालिकेच्या लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत.


बांद्रा, कुर्ला दादर परिसरातही जोरदार पाऊस


बांद्रा, कुर्ला आणि दादर परिसरातही जोरदार पाऊस सुरु आहे. पहाटेपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 


राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस


राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होत आहे. तर चांगल्या पावसामुळं बळीराजा समाधानी झाला. या पावसामुळं आता शेती कामांना वेग येणार आहे. दरम्यान, राज्यात कोकणासह मुंबई उपनगर ठाणे परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही पावसानं जोरदार बँटिंग केली आहे. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


आजही राज्यात पावासचा इशारा


आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्या तआला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यासह पुण्यात देखील पावसाचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे परिसरातही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस, वाहतुकीवर परिणाम; आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा