देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


देशात कुठं पाऊस तर कुठं उष्णतेचा तडाखा, वाचा हवामान विभागाचा अंदाज  


देशातील तापमानात (temperature) सातत्यानं बदल होत आहे. कुठे पाऊस (Rain) पडत आहे तर कुठे उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम आहे. मात्र, देशाची राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. (वाचा सविस्तर) 


पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर, कसा आहे मोदींच्या अमेरिका दौरा? 


अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या निमंत्रणावरुन मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान 22 जूनला अमेरिकेत त्यांच्यासाठी सरकारी स्नेहभोजनही ठेवण्यात आलंय. त्याशिवाय इतर भरगच्च कार्यक्रम दौऱ्यात असणार आहे. (वाचा सविस्तर)


पंतप्रधान मोदी चार दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना; त्यापूर्वी काँग्रेसला म्हणाले, "थँक्यू"; पण का? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चार दिवसांच्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि त्यांची पत्नी जिल बायडन (Jill Biden) यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला रवाना होत आहेत. अमेरिकेचा दौरा सुरू करण्यापूर्वी त्यांनी ट्वीट करून स्वागत केल्याबद्दल अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचे आभार मानले आहेत.  (वाचा सविस्तर)


 आसाममध्ये अतिवृष्टीमुळं पूरस्थिती, 30 हजाराहून अधिक लोकांना फटका; शेतीचं मोठं नुकसान


देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे पाऊस पडत आहे तर कुठे उन्हाचा चटका जावत आहे. अशातच आसाममध्ये (Assam) मात्र मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. 30 हजार लोकांना या पूरस्थितीचा फटका बसला आहे. आसाममधील 142 गावे पाण्याखाली आहेत. तर 1 हजार 510.98 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालं आहे. (वाचा सविस्तर)


इंडिगोकडून 500 नवीन एअरबस विमानं खरेदी करण्याची घोषणा 


 खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली इंडिगो एअरलाइन्सने मोठी घोषणा केली आहे. इंडिगो विमान कंपनी 500 नवीन एअरबस A320 खरेदी करणार आहे. कोणत्याही भारतीय विमान कंपनीकडून एकाच वेळी देण्यात आलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. (वाचा सविस्तर)


भारतीय सैन्याची ताकद वाढणार, महिंद्राने सुरू केली ‘आर्मडो’ या खास वाहनाची डिलिव्हरी 


 भारतीय सैन्याची ताकद वाढणार  आहे. महिंद्राने (Mahindra)  ‘आर्मडो’ या खास वाहनाची डिलिव्हरी सुरू  केली आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  यांनी स्वत: ट्वीट कर याची माहिती दिली आहे. महिंद्रा ग्रुपच्या महिंद्रा डिफेन्स सिस्टमने ही खास गाडी तयार केली आहे. (वाचा सविस्तर)


Horoscope Today : मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य 


आज वार मंगळवार. दिनांक 20 जून 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा मंगळार मेष ते मीन या राशींसाठी कसा राहील?  (वाचा सविस्तर)


 ब्रिटिशांनी मुंबईतील CST सर्वसामान्यांसाठी खुलं केलं, राणी लक्ष्मीबाईंच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर ब्रिटीश सैन्याने काबीज केले; आज इतिहासात 


20 जून ही तारीख देशात आणि जगाच्या इतिहासातील अनेक घटनांची साक्षीदार आहे. 1877 मध्ये 20 जून याच दिवशी मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकांसाठी खुले करण्यात आले. व्हिक्टोरियन गॉथिक शैली आणि पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रतिबिंबित करणारे स्टेशन 2004 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले. (वाचा सविस्तर)