India’s First Armored Light Specialist Vehicle:  भारतीय सैन्याची ताकद वाढणार  आहे. महिंद्राने (Mahindra)  ‘आर्मडो’ या खास वाहनाची डिलिव्हरी सुरू  केली आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  यांनी स्वत: ट्वीट कर याची माहिती दिली आहे. महिंद्रा ग्रुपच्या महिंद्रा डिफेन्स सिस्टमने ही खास गाडी तयार केली आहे.  


आनंद महिंद्रा यांनी व्हेइकलची डिलिव्हरी सुरू झाल्यानंतक एक ट्विट केले आहे. त्या ट्वीटमध्ये उद्योगपती  आनंद महिंद्रा म्हणाले, ” #MhindraDefence, आम्ही देशातील  पहिल्या आर्मर्ड लाइट स्पेशालिस्ट व्हेइकलची डिलिव्हरी सुरू केली आहे. सशस्त्र दलांसाठी या व्हेईकलचे डिझाईन करण्यात आली आहे. तसेच त्याची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे.






बॉम्ब, ग्रेनेडपासून  संरक्षण होणार


महिंद्राने अर्मार्डो ही खास भारतीय सेनेसाठी बनवण्यात आलेली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कारला गरज पडल्यास मोठ्या ऑपरेशनसाठी अपग्रेड करता येणार आहे. ALSV बी 7 स्टांग लेवल II हे  बॅलिस्टिक हल्ल्यापासून संरक्षण करते.  बॉम्ब, ग्रेनेडपासून  संरक्षण होणार आहे. आर्मडो हे एक आर्मर्ड लाईट स्पेशालिस्ट व्हेईकल असून यांचे डिझाईन आणि निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. 


1000 किलो इतक्या वजनाचा भार पेलण्याची  क्षमता


या वाहनाची 1000 किलो इतक्या वजनाचा भार पेलण्याची  क्षमता आहे. तसेच  क्षमतेपेक्षा ASLV हे आणखी 400  किलो वजन वाहून नेऊ शकते. Mahindra Armado मध्ये 3.2L चे डिझेल इंजिन आहे.  खडतर तसेच  वाळवंटामध्ये देखील मोहिमांमध्ये   वापरले जाई शकते. याचा टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे. सर्वात म्हणजे 30 डिग्रीवर देखील पार्किंग ब्रेकने थांबवता येणार आहे.  स्पेशल फोर्सेस आणि क्विक रिअ‍ॅक्शन टीममध्ये ही वापरता येणार आहे. तसेच    ऑपरेशन्स, शस्त्रात्र वाहून नेणे, सीमेवर गस्त घालणे इत्यादींसाठी वापर करू शकतात.


हे ही वाचा :  


Car Care Tips: कारमध्ये एसी कधी सुरू करावा? गाडी सुरू केल्यानंतर लगेच की गाडी काही वेळ चालवल्यानंतर? वाचा...


Car loan Information:

Calculate Car Loan EMI