PM Modi USA Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चार दिवसांच्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि त्यांची पत्नी जिल बायडन (Jill Biden) यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला रवाना होत आहेत. अमेरिकेचा दौरा सुरू करण्यापूर्वी त्यांनी ट्वीट करून स्वागत केल्याबद्दल अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचे आभार मानले आहेत. 


पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलंय की, "माझ्या आगामी यूएस दौऱ्याबद्दल त्यांनी जो उत्साह दाखवला त्याबद्दल मी काँग्रेसचे सदस्य, विचारवंत आणि इतरांचे आभार मानतो, असं सांगून ते म्हणाले की, असा उत्साह भारत-अमेरिका संबंधांची सखोलता दर्शवतो."






काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (20 जून) सांगितलं की, यूएस काँग्रेसच्या सदस्यांसह जीवनाच्या विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या आगामी यूएस दौऱ्यासाठी उत्साह दाखवत आहेत आणि असा पाठिंबा भारत-अमेरिका संबंधांची सखोलता दर्शवितो. मोदींनी यूएसमधील भारतीय दूतावासाच्या ट्विटर अकाऊंटला टॅग केलं, ज्यात यूएस काँग्रेसचे सदस्य, व्यावसायिक नेते, भारतीय-अमेरिकन आणि इतर अनेकांचे व्हिडीओ आहेत. यामध्ये ते पंतप्रधानांच्या दौऱ्यावर येण्याची तयारी करत आहेत.


पंतप्रधान मोदी 21 जूनपासून सुरू होणाऱ्या यूएस दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील आणि न्यूयॉर्कमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधानांनी यापूर्वी 2016 मध्ये अमेरिकन काँग्रेसला संबोधित केलं होतं.


मोदींचा सहावा अमेरिका दौरा


2014 नंतर मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे. पण या दौऱ्याचं महत्व नेहमीपेक्षा अधिक आहे. कारण यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन स्टेट व्हिजीटसाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलंय.आपल्या अत्यंत जवळच्या मित्रराष्ट्रांना, खास पाहुण्यांनाच अमेरिकेत स्टेट व्हिजिटसाठी बोलावलं जातं. त्यामुळे हा एक विशेष बहुमान मानला जातो. शिवाय अमेरिकेन संसदेला दोन वेळा संबोधित करणाऱ्या विस्टर्न चर्चिल, नेल्सन मंडेला या मोजक्या नेत्यांच्या यादीतही मोदींचा समावेश होईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर, कसा आहे मोदींच्या अमेरिका दौरा?