देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
जागावाटपाचं भिजत घोंगडं, आजतरी सुटणार? मविआची आज संयुक्त पत्रकार परिषद, अंतिम फॉर्मुला जाहीर होणार
Maha Vikas Aghadi PC Today : मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं, आचारसंहिताही (Code Of Conduct) लागली आता काहीच दिवसांत देशात लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडणार आहे. पण इतके राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीचं (Mahayuti) जागावाटपाचं भिजत घोंगडं काही मार्गी लागण्याचं नाव घेत नाही. अशातच आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद (Joint Press Conference Of Maha Vikas Aghadi) असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. वाचा सविस्तर
MNS Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरे काय बोलणार? भाजप-मनसे युतीची घोषणा करणार?
Raj Thackeray : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. शिवाजी पार्कात (Shivaji Park) होणाऱ्या या गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आज गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेले अनेक दिवस मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांना वेग आला होता. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे मनसे-भाजप युतीची घोषणा करणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. वाचा सविस्तर
Arvind Kejriwal : केजरीवालांना जेल की, बेल? आज सुनावणी; सुटका होणार की, पुन्हा कोठडीत रवानगी?
Arvind Kejriwal : नवी दिल्ली : दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान दिलं आहे, त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. वाचा सविस्तर
Prakash Ambedkar : ठाकरे आणि शरद पवारांनी स्वतःमध्ये बदल करावेत, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र
अकोला : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने स्वत:मध्ये बदल करण्याची गरज आहे, असं म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. महाविकास आघाडीचा विषय आता संपला, प्रचाराला सुरुवात झाली आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडरकांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. वाचा सविस्तर
MS Dhoni : अन् रवींद्र जाडेजा बॅटिंग न करताच परतला, नेमकं झालं काय?
Ravindra Jadeja MS Dhoni : थलायवा धोनीला बॅटिंग करताना पाहण्यासाठी चेन्नईचे चाहते आतुर असतात. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये गर्दी करतात. कोलकात्याविरोधातही धोनी मैदानात उतरल्यानंतर चाहत्यांनी हल्लाबोल केला. पण धोनीच्या चाहत्यांची रवींद्र जाडेजानं फिरकी घेतली.कोलकात्याविरोधात चेन्नई विजयाच्या उंबरठ्यावर होती, त्यावेळी शिवब दुबे बाद झाला. त्यानंतर धोनी फलंदाजीला येणार? असेच सर्वांना वाटलं. पण जड्डूने हातात बॅट घेत एन्ट्रीचं नाटक केले. वाचा सविस्तर
Horoscope Today 9 April 2024 : गुढीपाडव्याचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार भाग्याचा; अनपेक्षित धनलाभ होणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य
Horoscope Today 9 April 2024 : पंचांगानुसार, आज 9 एप्रिल 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काही राशींचं भाग्य पालटणार आहे. तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या... वाचा सविस्तर