Arvind Kejriwal : नवी दिल्ली : दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान दिलं आहे, त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयानं (ED) दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा मंगळवारी 9 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता निकाल देणार आहेत. याशिवाय केजरीवाल यांच्या वकिलांना भेटण्यासाठी अतिरिक्त वेळ मागणाऱ्या याचिकेवर राऊस ॲव्हेन्यू कोर्ट आज निर्णय देणार आहे.
गेल्या आठवड्यात झालेली सुनावणी
गेल्या आठवड्यात केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. कोर्टात युक्तिवाद करताना केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांची अटक 'स्क्रिप्टेड' असल्याचं सांगितलं होते. अटकेच्या वेळेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सिंघवी म्हणाले की, निवडणुकीदरम्यान अटक का? निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखलं जात आहे. आम आदमी पार्टी फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नॉन प्लेईंग लेबल फील्ड तयार करण्यासाठी फार पूर्वीचा घोटाळा केला जात आहे. ईडीचं पहिलं समन्स ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आलं होतं.
केजरीवाल यांच्या युक्तिवादाला ईडीचं उत्तर
मनु सिंघवी यांच्या युक्तिवादांना उत्तर देताना, ईडीच्या वतीनं एएसजी एसव्ही राजू म्हणाले की, समजा एखाद्या राजकीय व्यक्तीनं निवडणुकीच्या दोन दिवस आधी खून केला. त्याला अटक होणार नाही का? जर आम्ही प्रॉपर्टी अटॅच केली, तर ते म्हणतील की, निवडणूक आहे आणि ते आम्हाला सहभागी होऊ देत नाहीत आणि आम्ही तसं केलं नाही तर त्यांना काही मिळालं की नाही, असा युक्तिवाद करतात.
तब्बल 5 तास चाललेल्या चर्चेनंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या दिल्लीतील घरातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर अरविंद केजरीवालांना काही काळ ईडी कोठडीत ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीबाबत आम आदमी पक्ष सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहे.
पाहा व्हिडीओ : Arvind Kejriwal ED Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक