Maha Vikas Aghadi PC Today : मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं, आचारसंहिताही (Code Of Conduct) लागली आता काहीच दिवसांत देशात लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडणार आहे. पण इतके राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीचं (Mahayuti) जागावाटपाचं भिजत घोंगडं काही सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद (Joint Press Conference Of Maha Vikas Aghadi) असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. शरद पवार (Sharad Pawar), नाना पटोले (Nana Patole) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. 


महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करणार आहेत. यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर केला जाणार आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे. 


महाविकास आघाडीत सांगली, भिवंडीसह मुंबईतील तीन जागांवर तिढा कायम


ठाकरे गटानं विश्वासात न घेता परस्पर सांगलीचा उमेदवार जाहीर केल्याचं महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे मित्रपक्ष काँग्रेस आणि पवार गटानं म्हटलं आहे. ठाकरे गटाकडून सांगलीसाठी चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यात आली. सांगली, भिवंडी, मुंबईतील काही जागांसाठी काँग्रेस अजूनही आग्रही आहे. महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर केला जाणार आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.


पाहा व्हिडीओ : Jayant Patil Pune : मविआच्या जागा वाटपाबद्दलकाय ठरलं? जयंत पाटील म्हणाले...



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ज्यांनी वाटुळं केलंय, 'त्या' बारामतीकरांकडे मोहिते पाटलांनी जाऊ नये; आमदार शहाजीबापूंचं आवाहन, ईडीवरुन तुफान फटकेबाजी