Horoscope Today 9 April 2024 : पंचांगानुसार, आज 9 एप्रिल 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काही राशींचं भाग्य पालटणार आहे. तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या


मेष (Aries Horoscope Today)


एरवी पेक्षा जरा जास्त कष्ट करावे लागल्यामुळे विचार न करता चुकीच्या मार्गाने वाटचाल होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान थोडे त्रासदायक असेल. वातविकाराच्या लोकांनी काळजी घ्यावी.


वृषभ (Taurus Horoscope Today)


नोकरीधंद्यात परिस्थितीवर मात करण्याची शक्ती ईश्वर तुम्हाला देणार आहे. कौटुंबिक गोष्टींमध्ये चांगली फळं मिळतील. विचारांचा निश्चित असा ठामपणा तुमच्याकडे असल्यामुळे इतरांना या सप्ताहात तुम्ही थोडे आक्रमक भासाल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


तुमच्या प्रभावी बोलण्यामुळे समोरची व्यक्ती भारावून जाईल. नोकरी धंद्यातील अडचणी व्यवहार कुशलतेने सोडवाल. यामध्ये उत्तम समय सूचकता ठेवल्यामुळे अनेक लाभ मिळतील. 


कर्क  (Cancer Horoscope Today)


घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल. जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षा वाढतील. तरुणांच्या प्रेम प्रकरणांमध्ये प्रगती होईल. महिलांनी आपले विचार व्यक्त करायला हरकत नाही.


सिंह  (Leo Horoscope Today)


आज योगायोगाने कमी कष्टात विशेष त्रास न पडता मनासारख्या गोष्टी घडतील. तुम्ही जेवढे तापट आहात, तेवढेच क्षमाशील आहात, याचं प्रत्येंतर येईल. महिलांना प्रवासाचे योग घडतील.


कन्या (Virgo Horoscope Today)


आर्थिक बाबतीत बाळगलेलं स्वप्न साकार होईल. पैशाविषयी जास्त विचार कराल. लवकरात लवकर कामं उरकण्याकडे कल राहील. जिथे मान मिळेल तिथे पैसा खर्च कराल.


तूळ (Libra Horoscope Today)


कोणतंही काम करताना कंटाळा हा शब्द विसरून जाल. अगदी रटाळ काम सुद्धा उत्तम प्रकारे करू शकाल. महिलांच्या भावविश्वात कर्तव्याला महत्त्व जास्त राहील.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


खेळाडूंना नवनवीन संधी चालून येतील, याचा फायदा त्यांनी करून घ्यावा. काहीतरी नवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. महिलांच्या कामाच्या क्षमतेचं कौतुक होईल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्यात प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. मित्रांपासून सावधानता बाळगा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. महिलांना वैवाहिक सौख्यामध्ये तडजोड करावी लागेल.


मकर (Capricorn Horoscope Today)


जोडीदाराच्या भावना समजावून घेणं आवश्यक ठरेल. व्यवसाय नोकरीमध्ये अचानक बदल संभवतो. कोणतीही गोष्ट वेळेवर झाली पाहिजे या मताशी ठाम राहाल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आपल्या आवडीनिवडी इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-धंद्यातील अडचणी मार्गी लागतील. महिला येईल त्या परिस्थितीला धीटपणे सामोऱ्या जातील.


मीन (Pisces Horoscope Today)


पूर्वीचे जुनी दुखणी डोकं वर काढतील. औषधोपचार आणि पथ्य पाणी वेळेवर घेणं आवश्यक आहे. परंतु सतत उद्योगी आणि महत्त्वाकांक्षी राहाल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


हेही वाचा:


Gudi Padwa 2024 : आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं