देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Maharashtra Politics : आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट? उद्धव ठाकरे गप्प का? दीपक केसरकरांचा सवाल


ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही या बातमीचा दाखला देत उद्धव ठाकरे भेटीच्या बातम्यांचं खंडन का करत नाही असा सवाल केला आहे. वाचा सविस्तर...


Rain Alert : वरुणराजा बरसणार! अवकाळी पावसाची शक्यता कायम, आज 'या' भागात पावसाची शक्यता


IMD Rain Forecast : देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) थैमान घातलं असून आजही पावसाची शक्यता (Rain Alert) कायम आहे. पुढील 24 तासात महाराष्ट्रासह (Maharshtra Rain) देशात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काश्मीर खोऱ्यासह पर्वतीय भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. परिणामी उत्तर भारतात तापमानात घट (Cold Weather) झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपलं असून हवेत गारवा पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर...


आनंदवार्ता! सीएनजीच्या दरात मोठी कपात, महानगर गॅसने जाहीर केले नवे दर


Mahanagar Gas reduces price of CNG in Mumbai :  महागाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. महानगर गॅसने (Mahanagar Gas CNG Station) सीएनजी (CNG Price) दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. सीएनजीच्या दरांमध्ये प्रति किलो 2.5 रुपये कपात करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतला आहे. आता मुंबईमध्ये महानगर गॅसचे सीएनजीची किंमत प्रति किलोग्रॅम  73.50 रुपये इतकी असेल. आजपासून  हे नवे दर लागू होणार आहेत. (CNG Price Reduce in Mumbai and MMR Region) दरम्यान पीएनजीच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाचा सविस्तर...


Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे प्रशासन अलर्टवर, कलम 144 लागू; रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांवर मोठा पोलीस बंदोबस्त


Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा 'चलो दिल्ली'ची (Chalo Delhi) हाक दिली आहे. शेतकरी संघटनाच्या दिल्ली चलोच्या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. आज 6 मार्चला मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता आहे. शेतकरी मोर्चामुळे दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. दिल्ली आणि सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासन अलर्टवर आहे. वाचा सविस्तर...


2050 पर्यंत देशात वृद्धांची संख्या वाढणार, देखभाल अर्थव्यवस्थेकडे व्यवसाय म्हणून पाहणं आवश्यक : स्मृती इराणी  


Indian Economy: देखभाल अर्थव्यवस्था (Economy) केवळ पाळणाघरापुरती मर्यादित ठेवू नये, कारण यामुळे देखभाल अर्थव्यवस्थेचा आर्थिक प्रभाव दुर्लक्षित राहतो. त्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखभाल अर्थव्यवस्थेकडे व्यवसाय म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani)  यांनी व्यक्त केलं. दरम्यान, 2050 पर्यंत देशात वृद्धांची संख्या वाढणार असल्याचेही इराणी म्हणाल्या. वाचा सविस्तर...


IPL 2024 : आरंभ है प्रचंड... थाला धोनी चेन्नईत दाखल, आयपीएलच्या तयारीला वेग


MS Dhoni lands in Chennai ahead of IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा थरार तीन आठवड्यानंतर सुरु होणार आहे. 22 मार्चपासून आयपीएल (IPL 2024) स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. धोनीच्या चेन्नईमध्ये आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये (CSK vs RCB) सलामीची लढत होणार आहे. आयपीएलसाठी एमएस धोनी (MS Dhoni) चेन्नईमध्ये दाखल झालाय. थाला, कॅप्टन कूल मंगळवारी चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालाय. गतविजेत्या चेन्नईनं धोनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. वाचा सविस्तर...


बुधवारी 'या' राशीच्या लोकांनी अनावश्यक वाद टाळावा, मेष ते मीन 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope 6th March 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...