Maharashtra Politics : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी दिल्लीत (Delhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) आणि भाजप (BJP) यांच्यात काही खलबतं सुरु आहेत का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यावरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याच्या प्रसारमाध्यमांतील बातमीचा दाखला देत उद्धव ठाकरे भेटीच्या बातम्यांचं खंडन का करत नाही असा सवाल, दीपक केसरकरांनी विचारला आहे.


आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट? 


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे की, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोंदींना भेटल्या असं वृत्तपत्रात छापून आलं होतं आणि प्रसार माध्यमांमध्येही तशा बातम्या दाखवल्या गेल्या. मात्र, त्यांनी या बातम्यांचं खंडन केलेलं नाही. 


तुमची गँरटी आहे का ? दीपक केसरकरांचा सवाल


उद्धव ठाकरे यांनी चर्चा आणि बातम्यांचं खंडन केलेलं नाही, त्यामुळे आंबेडकरांनी उपस्थित केलेला प्रश्न तो योग्य आहे की, तुमची गँरटी आहे का आणि तुम्ही इतरांना आघाडीत येण्यास सांगताय. आंबेडकर तत्त्वासाठी लढणारे नेते, ते त्याच्यासाठीतच महाराष्ट्रात ओळखलं जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी याचं उत्तर द्यावं, असं केसरकरांनी म्हटलं आहे. आता तरी शिवसैनिकांनी डोळे उघडावे, असं केसरकरांनी म्हटलं आहे.


वंचित आघाडीत सामील होणार?


वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील व्हावं, अशी इच्छा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी वारंवार बोलून दाखवली आहे. मात्र, कोणत्याही पक्षासोबत युती करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत लोकसभेत उतरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


ठाकरे गट आणि भाजपची जवळीक वाढतेय?


ठाकरे-फडणवीस कुटुंबातील जवळीक साधणारी बातमी आणखी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या दोघींनी एकत्र प्रवास केला. मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी -राधिक मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्रीवेडिंग सोहळ्याला दोघींनी हजेरी लावली होती. गुजरातच्या जामनगरमध्ये हा सोहळा होता. या सोहळ्याला जाताना मुंबई ते जामनगर (Mumbai to Jamnagar) असा प्रवास दोघींनी एकत्र केल्याचं सांगण्यात येत आहे.