Mahanagar Gas reduces price of CNG in Mumbai :  महागाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. महानगर गॅसने (Mahanagar Gas CNG Station) सीएनजी (CNG Price) दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. सीएनजीच्या दरांमध्ये प्रति किलो 2.5 रुपये कपात करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतला आहे. आता मुंबईमध्ये महानगर गॅसचे सीएनजीची किंमत प्रति किलोग्रॅम  73.50 रुपये इतकी असेल. आजपासून  हे नवे दर लागू होणार आहेत. (CNG Price Reduce in Mumbai and MMR Region) दरम्यान पीएनजीच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


ग्राहकांना नैसर्गिक वायूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड  कंपनीने गॅसच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस इनपुट कॉस्ट कमी झाल्यामुळे मुंबईत सीएनजी गॅसच्या (CNG)किमतीत रु. 2.5/Kg कपात करण्याची घोषणा केली आहे. मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.  


सीएनजीची सुधारित एमआरपी 5 मार्च 2024 च्या मध्यरात्रीपासून 6 मार्च सकाळपासून 73.50 रुपये प्रति किलोग्रॅम असेल. एमजीएलची सीएनजी किंमत आता पेट्रोलच्या तुलनेत 53% आणि मुंबईतील सध्याच्या किमतीच्या पातळीवर डिझेलच्या तुलनेत 22% बचत होते. त्यामुळे ग्राहकांना सुविधा, सुरक्षा, विश्वासार्हता आणि पर्यावरण अनुकूलता इत्यादी गोष्टींचा फायदा व्हायला मदत होते.






सीएनजीच्या किमतीत कपात झाल्यामुळे वाहतूक क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यास मदत निश्चितच मदत होऊ शकेल. हे स्वच्छ आणि हरितक्रांतीच्या दिशेने भारताने टाकलेले पाऊल आहे, असे मत महानगर गॅस लिमिटेडने व्यक्त केले आहे.


CNG म्हणजे काय?


सीएनजीचे पूर्ण नाव "कंप्रेस्ड नॅचरल गॅस" आहे. हा देखील नैसर्गिक वायू आहे, परंतु तो उच्च दाबाने (200 बार पर्यंत) कम्प्रेस्ड केला जाते. सीएनजीचा वापर वाहनांसाठी केला जातो. वाहनांमध्ये इंधनाऐवजी सीएनजी वापरला जातो. सिलेंडरमध्ये अधिकाधिक वायू साठवून त्याचा दीर्घ कालावधीसाठी वापर करणे हा गॅस कम्प्रेस करण्याचा मुख्य उद्देश आहे.


आणखी वाचा :


IPL मध्ये फक्त 9 खेळाडूंचं अनोखं द्विशतक, धोनी पहिला, विराट-रोहित कोणत्या क्रमांकावर?