MS Dhoni lands in Chennai ahead of IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा थरार तीन आठवड्यानंतर सुरु होणार आहे. 22 मार्चपासून आयपीएल (IPL 2024) स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. धोनीच्या चेन्नईमध्ये आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये (CSK vs RCB) सलामीची लढत होणार आहे. आयपीएलसाठी एमएस धोनी (MS Dhoni) चेन्नईमध्ये दाखल झालाय. थाला, कॅप्टन कूल मंगळवारी चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालाय. गतविजेत्या चेन्नईनं धोनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. 


आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी धोनी आणि चेन्नईचा संघ तयार झाला आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आपली फ्रेंचायजी चेन्नईच्या ताफ्यासोबत जोडला गेलाय. चेन्नईच्या संघाने धोनीचे फोटो पोस्ट केले आहेत. तर हॉटस्टारनं धोनीचा व्हिडीओ शेअर केला आहे. धोनीने 2023 मध्ये चेन्नईला पाचव्यांदा चषक जिंकून दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असेल. त्यानंतर तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. 






सीएसकेकडून आयपीएलसाठी प्री-सीजन ट्रेनिंग कॅम्पची सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी चेन्नईच्या संघातील काही खेळाडू कॅम्पमध्ये दाखल झाले होते. त्यामध्ये दीपक चाहर, ऋतुराज गायकवाड, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अजय मंडल, शेख रशीद आणि निशांत सिंधू यांच्या नावाचा समावेश होता. चेन्नईच्या चमूसोबत धोनीही दाखल झालाय. चेन्नई 2024 च्या आयपीएल हंगामाची सुरुवात 22 मार्चपासून करणार आहे. चेन्नईचा पहिला सामना आरसीबीसोबत होणार आहे. त्याच्या तयारीसाठी चेन्नईच्या संघाने कंबर कसली आहे.










आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्यातील चेन्नईचं वेळापत्रक - 


चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
 
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
 
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
 
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता 


Chennai Super Kings Players: यंदाच्या हंगामासाठी चेन्नईच्या ताफत कोण कोण?


अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, शार्दूल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रविंद्र, अविनाश रॉय 


Chennai Super Kings Players: Ajay Mandal, Ajinkya Rahane, Deepak Chahar, Devon Conway, Maheesh Theekshana, Matheesha Pathirana, Mitchell Santner, Moeen Ali, MS Dhoni, Mukesh Choudhary, Nishant Sindhu, Prashant Solanki, Rajvardhan Hangargekar, Ravindra Jadeja, Ruturaj Gaikwad, Shaik Rasheed, Shivam Dube, Simarjeet Singh, Tushar Deshpande,  Daryl Mitchell,  Sameer Rizvi,  Shardul Thakur,    Mustafizur Rahman,  Rachin Ravindra ,  Avanish Rao Aravelly  


धोनीच्या चेन्नईनं पाचवेळा चषकावर नाव कोरलं - 
 
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2023 चं विजेतपद पटकावत, पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला होता. चेन्नईने अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने  शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.