देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली; मूर्तीकार अरूण योगीराज यांनी साकारलं प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप


Ayodhya Ram Mandir Ramlala Idol: अयोध्या : अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीचा (Ramlala Idol) भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. अयोध्येत (Uttar Pradesh Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरातील (Ram Mandir Ayodhya) रामललाच्या मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी प्रभू रामाच्या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Union Minister Pralhad Joshi) यांनी 'ट्विटर'वर यासंदर्भात माहिती दिली आहे... वाचा सविस्तर 


अयोध्येतील विवादित प्रकरणाच्या निकालावर सर्व न्यायाधीशांचं एकमत कसं झालं? सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्टच सांगितलं


CJI DY Chandrachud on Ayodhya: सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी राम जन्मभूमी (Ram Janmabhoomi) आणि कलम 370 (Section 370) वरील कोर्टाच्या निर्णयांवर मोठं भाष्य केलं आहे. श्रीराम जन्मभूमी केसमधील निर्णय हा न्यायालयाचा निर्णय होता, कुणा व्यक्तीचा नव्हे आणि म्हणूनच तो निर्णय कुठल्या न्यायमूर्तींनी लिहिला हे आम्ही जाहीर केलं नाही असं चंद्रचूड म्हणाले. कलम 370 हटवण्याचा केंद्राचा निर्णय वैध होता असा निर्णय कोर्टानं काही दिवसांपूर्वी गेला. त्यावर प्रतिक्रिया देण्यास चंद्रचूड यांनी साफ नकार दिला... वाचा सविस्तर 


Weather Update : पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, या आठवड्यात हवामान कसं असेल?


Weather Update Today : नवीन वर्षात देशात बहुतेक सर्व ठिकाणी तापमानात मोठी घट (Temperature Drops) झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात बदल (Weather Update) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर (Fogg) पसरल्याचं चित्र दिसत आहे. पहाटेच्या वेळी धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हवामान खात्याकडून देशात आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज आहे... वाचा सविस्तर 


Seema Haider Pregnant : पाकिस्तानी सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार? म्हणाली,"2024 मध्ये गुडन्यूज देणार"


Seema Haider Pregnant : पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) पुन्हा एकदा प्रेग्नंसीमुळे चर्चेत आली आहे. लवकरच ती पती सचिन मीनाच्या बाळाची आई होणार आहे. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सीमाने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. 2024 मध्ये एक गुडन्यूज देणार असल्याचंही ती म्हणाली... वाचा सविस्तर 


नववर्षाच्या आनंदावर विरजण; शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरलं, त्सुनामीचाही इशारा, अंगावर शहारे आणणारे VIDEO VIRAL


Japan Earthquake: नवंवर्ष (New Year 2024) सुरू झालं आहे, येतं वर्ष अनेक गोष्टी घेऊन आलं आहे आणि त्याबाबत अनेक भविष्यवाण्या जगभरातील जोतिषांनी केल्या आहेत. अनेक जोतिषांनी 2024 च्या काळात अनेक संकट जगावर येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता ही भविष्यवाणी खरी ठरतेय की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यासाठी कारण ठरलंय जपानमध्ये (Japan Earthquake) सातत्यानं जाणवत असलेले भूकंपाचे धक्के... वाचा सविस्तर 


2nd January In History : आजच्या दिवशी सुरू झाला भारतरत्न पुरस्कार,  गीतकार सफदर हश्मी यांचे निधन; आज इतिहासात 


मुंबई : भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात देशाची असाधारण आणि उल्लेखनीय सेवा करणाऱ्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' (Bharat Ratna) दिला जातो. 2 जानेवारी 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (Former President of India Rajendra Prasad) यांनी या सन्मानाची स्थापना केली होती. 2 जानेवारी 1989 मध्ये कवी आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन झाले. तसेच वीर भाई कोतवाल यांचे देखील आजच्या दिवशी निधन झाले. प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. वाचा सविस्तर 


Horoscope Today 2 January 2024 : आजचा मंगळवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 2 January 2024 : राशीभविष्यनुसार आज म्हणजेच 2 जानेवारी 2024 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीच्या लोकांना आज डॉक्टरकडे जावे लागू शकते. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील काही शुभ समारंभात सहभागी होऊ शकता, आज तूळ राशीचे लोक भावनिक होऊन तुमचे काही चालू असलेले काम बिघडू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर