Japan Earthquake: नवंवर्ष (New Year 2024) सुरू झालं आहे, येतं वर्ष अनेक गोष्टी घेऊन आलं आहे आणि त्याबाबत अनेक भविष्यवाण्या जगभरातील जोतिषांनी केल्या आहेत. अनेक जोतिषांनी 2024 च्या काळात अनेक संकट जगावर येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आता ही भविष्यवाणी खरी ठरतेय की काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यासाठी कारण ठरलंय जपानमध्ये (Japan Earthquake) सातत्यानं जाणवत असलेले भूकंपाचे धक्के.
2024 चा पहिला दिवस जपानसाठी शुभ ठरला नाही. देशात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मध्य जपानच्या भागात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. जपानमध्ये सातत्यानं जाणवलेल्या भूकंपांच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. जपानमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किनारी भागात राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर उंच ठिकाणांवर जाण्याचा सल्ला दिला आहे. जपानच्या हवामान खात्यानं इशारा दिला आहे की, काही भागांत पाच मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
भूकंपाची तीव्रता इतकी होती की, रेल्वे आणि मेट्रोही थांबवण्यात आल्या होत्या. जपानमधील तीस हजार घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सरकारनं आणखी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवू शकतात, असा इशारा दिला आहे. भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जपानमध्ये भूकंपानं कसा हाहाकार माजवला आहे, याचे अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
जपान भूकंपाने हादरलं
उत्तर मध्य जपानमध्ये7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर त्सुनामीमुळे देखील जपान पुन्हा एकदा हादरलं. यापूर्वी हवामान खात्याने जपान सागरी किनारा तसेच निगाटा, टोयामा, यामागाता, फुकुई आणि ह्योगो प्रांतांसाठी त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यामुळे जपानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणवर भूकंपाच्या धक्क्यांमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :