Seema Haider Pregnant : पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) पुन्हा एकदा प्रेग्नंसीमुळे चर्चेत आली आहे. लवकरच ती पती सचिन मीनाच्या बाळाची आई होणार आहे. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सीमाने स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. 2024 मध्ये एक गुडन्यूज देणार असल्याचंही ती म्हणाली.


प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर 2023 मध्ये चांगलीच चर्चेत होती. सीमासह तिचा पती सचिन मीना आणि त्याच्या कुटुंबियांनीदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अवैध पद्धतीने भारतात प्रवेश केल्यामुळे सीमा हैदर आणि सचिन मीना यांची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे.


सीमा हैदर पुन्हा चर्चेत


सीमा हैदर 2024 च्या सुरुवातीला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या ती तिचा पती सचिन मीनासोबत नोएडामध्ये राहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सीमा हैदर लवकरच आई होणार आहे. यासंदर्भात बोलताना सीमा म्हणाली,"2024 मध्ये मी एक आनंदाची बातमी देणार आहे. मिठाईदेखील देईल. 2024 मध्ये सचिनचा वाढदिवस असून यावेळी आणखी कोणाचा जन्म झाला तर नक्कीच आनंद आहे". 


चार मुलांसह भारतात आलेली सीमा हैदर


सीमा हैदर लवकरच एक आनंदाची बातमी देणार आहे. पाकिस्तानातून भारतात येताना सीमा तिच्यासोबत चार मुलं घेऊन आली होती. सीमा सध्या भारतात हिंदू संस्कृतीचं पालन करताना दिसून येते. दिवाळीसारखा सणदेखील तिने जल्लोषात साजरा केला आहे. तर रक्षाबंधनला तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राखी पाठवली होती. एका व्हिडीओमध्ये सीमा म्हणाली होती,"माझ्या मुलांचं भविष्य भारतातच असेल. मुलांचं भविष्य उज्जवल करण्यात सचिन मीना लक्ष देईल". 


सीमा हैदर अवैधरित्या आलेली भारतात


पाकिस्तानी सीमा हैदर 13 मे 2023 रोजी तिच्या चार मुलांसह कराचीहून नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली होती. सध्या ती पती सचिन मीनासोबत नोएडामध्ये राहत आहे. सीमाचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे. यासंदर्भात अनेकदा तिची चौकशीदेखील करण्यात आली आहे. याआधी प्रेग्नंसीबाबत बोलताना सीमा हैदर म्हणाली होती,"गरोदर असणं किंवा नसणं ही माझी वैयक्तिक बाब आहे. आता काही बोलले तर नजर लागेल". 


सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर आधारित 'कराची टू नोएडा' (Karachi To Noida) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला असून आता सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदर पाचव्यांदा आई होणार? प्रेगन्सीबाबत म्हणाली...