Morning Headlines 25th August : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
पंतप्रधान आज मायदेशी परतणार, दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार, इस्रोच्या शास्त्रज्ञांची घेणार भेट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा दौरा संपवून ते आज (25 ऑगस्ट) भारतात परतणार आहेत. पण पंतप्रधान मोदींचं विमान दिल्लीत न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमच्या सर्व शास्त्रज्ञांची पंतप्रधान भेट घेणार आहेत. तसेच त्यांचे अभिनंदन देखील पंतप्रधान करणार आहेत. वाचा सविस्तर
Donald Trump Arrested : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचल्याचा आरोप
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जॉर्जिया राज्यात अटक झाली. 2020 साली झालेली अध्यक्षपदाची निवडणूक उलथवून लावण्याचा कट रचणे आणि फसवणूक असे गंभीर आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. अटक झाल्यावर जेलमध्ये ट्रम्प यांचा कैद्यासारखा फोटो देखील काढण्यात आला. मात्र वीसच मिनिटांत त्यांना दोन लाख डॉलर्सच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि मग तिथून ते आपल्या न्यू जर्सीमधील निवासस्थानाकडे रवाना झाले. वाचा सविस्तर
BRICS Summit : 'भारत-चीनचे सबंध चांगले ठेवण्यासाठी एलएसीचा सन्मान करणं आवश्यक', पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी संवाद
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेमधील ब्रिक्सच्या शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही औपचारिक द्विपक्षीय बैठक झाली नाही. तरीही या दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद झाला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी केलेल्या संवादाबाबतची माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारत आणि चीनमधील संबंध चांगले ठेवण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता ठेवणे आणि एलएसीचा सन्मान करणं आवश्यक आहे.'
वाचा सविस्तर
देशभरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, तुमच्या राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल? वाचा IMD चा अंदाज
नवी दिल्ली : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर देशभरात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे उत्तर भारतातील लोकांना दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात आज शुक्रवारी (25 ऑगस्ट) रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, या आठवड्यात उत्तर पश्चिम भारताच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Petrol and Diesel Price: आज 506 वा दिवस, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; तुमच्या शहरांतील किमती काय?
नवी दिल्ली : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी विविधं शहरं आणि राज्यांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. अनेक ठिकाणी किमती कमी झाल्या आहेत, तर अनेक ठिकाणी इंधनाच्या दरांतही वाढ नोंदवली जात आहे. दुसरीकडे, जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीबद्दल बोललो, तर आजही त्यात घसरण सुरुच आहे. WTI कच्च्या तेलाची किंमत 0.03 टक्क्यांनी घसरली असून प्रति बॅरल 79.03 डॉलरवर पोहोचली आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतींत 0.10 टक्क्यांनी घट झाली आहे आणि ती प्रति बॅरल 83.28 डॉलरवर कायम आहे. वाचा सविस्तर
Odisha Train Accident : ओरिसाच्या बालासोर येथील ट्रेन अपघाताबाबत CBI ने कोर्टात काय सांगितले?
ओदिशा : ओदिशातील बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळील लेव्हल क्रॉसिंगवर दुरुस्तीचे काम जेथे 2 जून रोजी रेल्वे अपघात झाला होता, ते वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता यांच्या मंजुरीशिवाय आणि मंजूर सर्किट आकृतीशिवाय करण्यात आले होते, अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली आहे. वाचा सविस्तर
सिंह, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 25 August 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. तर, तूळ राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा शुक्रवार नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर
कोल्हापुरात शरद पवारांची जाहीर सभा, अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; आज दिवसभरात
25th August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरच्या दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. आज उद्धव ठाकरे लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अखेरच्या दिवशी विविध लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. वाचा सविस्तर