देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Dasara Melava : शिवसेनेचे दोन्ही गट ते कोल्हापुरातील शाही दसरा; पाच ठिकाणं अन् आज पाच जंगी कार्यक्रम


मुंबई: 30 ऑक्टोबर 1966... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने दसरा मेळाव्याची (Shivsena Dasara Melava) मुहूर्तमेढ रोवली. त्याला आता 57 वर्ष झाली. या 57 वर्षांत दरवर्षी बाळासाहेबांनी केलेल्या भाषणांनी पुढील काही दिवस महाराष्ट्र ढवळून निघायचा. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. दोन शिवसेना आहेत आणि दोन दसरा मेळावेही. वाचा सविस्तर...


Weather Update : उत्तर भारतात गुलाबी थंडीची चाहूल, 'या' राज्यात पावसाचा अंदाज; आजचं हवामान कसं असेल?


IMD Weather Update : देशात एकीकडे गुलाबी थंडी (Winter) ची चाहूल लागली आहे, तर काही भागात पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतात थंडी पडण्यास सुरुवात झाली असून पहाटे आणि रात्री वातावरणात अधिक गारवा जाणवत आहे. येत्या काही दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दिल्ली आणि लखनौमध्ये पुढील पाच दिवस दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...


Gujarat Bridge Collapse :  गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती


Gujarat Bridge Collapse : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात निर्माणाधीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ओव्हरब्रिजचा मोठा भाग कोसळला. ओव्हर ब्रिजचे पाच गडर्स एकाच वेळी खाली कोसळले. या दुर्घटनेत एका रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर...


Bangladesh Train Accident : मोठी बातमी! बांगलादेशमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्याने 17 जणांचा मृत्यू


Bangladesh Train Accident : बांगलादेश (Bangladesh) मध्ये मोठी दुर्घटना (Train Accident) घडली आहे. दोन ट्रेनची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) जवळ हा अपघात झाला. वाचा सविस्तर...


Israel Hamas War : पंतप्रधानांनी हमासच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारावी, इस्रायलची जनता नेतन्याहू यांच्या विरोधात


Israel Hamas Attack : इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Palestine War) यांच्यातील युद्धाला 17 दिवस उलटून गेले आहेत. दोन्हीमधील संघर्ष सुरुच आहे. असं असताना दोन्ही बाजूच्या नागरिकांचे मात्र हाल होतं आहेत. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला आणि या युद्धाला तोंड फुटलं. दरम्यान, या युद्धामुळे इस्रायली जनता मात्र, नेत्यानाहू यांच्या विरोधात असल्याचं समोर येत आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी इस्रायलच्या नागरिकांची भावना आहे.  वाचा सविस्तर...


24 October In History : व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांचा जन्म, गायक मन्ना डे यांचे निधन, देशातील पहिली भूमिगत मेट्रो धावली; आज इतिहासात 


24 October In History : प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. काही ऐतिहासिक, महत्त्वाच्या घटना या दिवसात घडलेल्या असतात. आज जागतिक पोलिओ दिन आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा आज स्थापना दिन आहे. आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा (Azad Hind Sena Captain Laxmi Sehgal) जन्मदिन आहे. तर, आपल्या व्यंगचित्रातून देशातील कॉमन मॅनच्या व्यथा आणि राजकीय टिप्पणी करत व्यवस्थेला प्रश्न करणारे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण (R K Laxman birth anniversary) यांचा जन्मदिन आहे. तर, सुप्रसिद्ध गायक मन्ना डे ( Manna Dey ) यांचा आज स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर...


Horoscope Today 24 October 2023 : दसऱ्याचा दिवस 'या' राशींसाठी सोन्याचा! 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 24 October 2023 : राशीभविष्यानुसार आज 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज देशभरात विजयादशमीचा सण साजरा होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी तुमचे तारे काय सांगतात?, सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर...