Bangladesh Train Accident : बांगलादेश (Bangladesh) मध्ये मोठी दुर्घटना (Train Accident) घडली आहे. दोन ट्रेनची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) जवळ हा अपघात झाला. ढाका (Dhaka News) ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, किशोरगंज मधील भैरब येथे दुपारी मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला (Bangladesh Train Collision) धडक बसून हा अपघात झाला. अपघातातील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात सुमारे 100 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


बांगलादेशमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना


स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ढाकापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरबमध्ये हा अपघात झाला. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, मदतकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, अनेक लोक ट्रेनखाली अडकले होते, तर अनेक जखमी डब्याखाली पडून होते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.






दोन ट्रेनची टक्कर होऊन 17 जणांचा मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मदत आणि बचावकार्य (Aid and Rescue) सुरू आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. वृत्तानुसार, जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकही मदत करत आहेत. ढाका रेल्वेचे पोलीस अधीक्षक अन्वर हुसैन यांनी सांगितलं की, प्राथमिक अहवालात मालगाडी एगारो सिंदूरला मागून धडकली, त्यामुळे दोन डबे एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.


मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता


राजधानी ढाका (Dhaka) पासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरब येथे पॅसेंजर ट्रेन (Passenger Train) ची मालवाहू ट्रेनला धडक बसल्याने हा अपघात झाला. ढाकाहून निघालेली गोधुली एक्स्प्रेस चट्टोग्रामकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रेनला धडकल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर देशाच्या इतर भागांना जाणारी रेल्वे सेवा ठप्प आहे. या अपघातात अनेक जण ट्रेनखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती