Gujarat Bridge Collapse : गुजरात (Gujrat) च्या बनासकांठा जिल्ह्यात निर्माणाधीन पूल कोसळून (Under Construction Bridge Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. ओव्हरब्रिजचा मोठा भाग कोसळला. ओव्हर ब्रिजचे पाच गडर्स एकाच वेळी खाली कोसळले. या दुर्घटनेत एका रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला


गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. पालनपूरमध्ये आरटीओ सर्कलजवळ पुलाचे काम सुरू असताना ही घटना घडली आहे. रिक्षाचालक जीव वाचवण्यासाठी धावत असताना अचानक पुलाचा स्लॅब कोसळल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.


पाहा व्हिडीओ :






राष्ट्रीय महामार्ग 58 वर अपघात


पालनपूर येथील राष्ट्रीय महामार्ग 58 वरील रेल्वे ओव्हरब्रिजचा गर्डर कोसळल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही दुर्घटना अत्यंत गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघात कसा घडला, याचं कारण शोधण्यासाठी राज्य सरकारच्या रस्ते बांधकाम विभागाचे गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक अभियंता, डिझाईन सर्कलचे अधीक्षक अभियंता आणि GERI चे अधीक्षक अभियंता यांना तातडीने पालनपूर गाठण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अधीक्षक अभियंत्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाताची अधिक माहिती समोर येईल.






गुजरातमधील सर्वात उंच पूल


पूल कोसळल्याची घटना अतिशय भीषण होती. पूल कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला. आरटीओ सर्कल येथे बांधकाम सुरू असलेला हा ओव्हरब्रिज गुजरातमधील सर्वात उंच पूल असल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bangladesh Train Accident : मोठी बातमी! बांगलादेशमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्याने 17 जणांचा मृत्यू