देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Uttarkashi Tunnel Rescue : 41 मजुरांचा जीव वाचवण्यासाठी धडपड, बरकोटच्या टोकापासूनही ड्रिलिंग सुरू
Uttarakhand Tunnel Accident : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये (Uttarkashi) बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी बरकोट येथे सरळ उभ्या मार्गाने ड्रिलिंगसाठी एक जागा निश्चित करण्यात आली आहे. बोगद्याच्या वरच्या भागात सरळ मार्गाने बोगदा खोदण्यासाठी मशीन बसविण्याचं काम सुरू झालं आहे. बोगद्यात बाजूनेही उभ्या आणि आडव्या ड्रिलिंग करण्यासाठी पावले उचलली आहेत. सिल्क्यराकडे औजर मशीनच्या साह्याने आडव्या दिशेने खोदण्याचे काम रात्री सुरू होते. मजुरांना बाहेर काढण्यासाठी उभ्या, आडव्या आणि तिरप्या मार्गाने बोगदा खणण्याचे काम सुरु आहे. 41 मजुरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात सुरु आहेत. 12 नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीमध्ये सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग कोसळला होता. वाचा सविस्तर
टाटासह 6 कंपन्यांचा IPO 'या' आठवड्यात शेअर बाजारात; 7 हजार 300 कोटी उभारण्याचा कंपन्यांचा मानस
IPO Updates: यंदाच्या आठवड्यात 6 आयपीओ (IPO) बाजारात दाखल होणार आहेत. टाटासह (TATA Group) 6 कंपन्यांचा आयपीओ या आठवड्यात शेअर बाजारात येणार आहे. आयपीओच्या माध्यमातून तब्बल 7 हजार 300 कोटी रूपये उभारण्याचा 6 कंपन्यांचा मानस असल्याची माहिती मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजीज (Tata Technologies), इरेडा (Indian Renewable Energy Development Agency), गांधार ऑईल रिफायनरी (Gandhar Oil Refinery), फ्लेयर रायटिंग इंडस्ट्रीज (Flair Writing Industries), रॉकिंग डिल्स सर्क्युलर इकॉनॉमी (Rocking Deals Circular Economy) आणि फेडबॅंक फायनान्शिअल कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहे. वाचा सविस्तर
"36 तासांत डीपफेक व्हिडीओ हटवा, नाहीतर..."; केंद्र सरकारचं व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना अल्टिमेटम
Deepfake Issue India: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आणि तेव्हापासूनच सोशल मीडियावर डिपफेक व्हिडीओंचा (Deepfake Video Issue) प्रश्न ऐरणीवर आला. अशातच आता या डिपफेक व्हिडीओ (Deepfake Video) प्रकरणी केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलली आहे. सोशल मीडियावर डिपफेक व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना केंद्र सरकारनं थेट अल्टिमेटमच देऊन टाकलं आहे. येत्या 36 तासांत फेसबुक, गुगल आणि युट्युबवरुन डीपफेक व्हिडीओ हटवा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, अशा इशारा केंद्र सरकारनं डिपफेक व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना दिला आहे. वाचा सविस्तर
Ram Mandir Pujari : राम मंदिरातील पुजारी पदांसाठी 3 हजार अर्ज, 200 उमेदवारांची मेरिट लिस्ट; मुलाखतीनंतर होणार निवड
Ram Mandir Vacancy : अयोध्येमध्ये (Ayodhya) भव्य राम मंदिराचं (Ram Temple) निर्माण काम प्रगतीपथावर आहे. दोन महिन्यानंतर राम मंदिरामध्ये रामलल्लाची स्थापना होणार आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या भव्य राम मंदिरात पुजारी पदांसाठी (Pujari Job) भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राम मंदिरातील पुजारी (Pandit) पदांसाठी 3 हजार अर्ज प्राप्त झाले होते, त्यानंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट जारी करण्यात आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून उमेदवारांची मुलाखत घेण्यास सुरुवात झाली आहे. वाचा सविस्तर
Gold Silver Rate : सोनं-चांदी महागलं! लग्नसराईच्या काळात आजचा सोन्याचा दर काय?
Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशात तुम्हीही सोने-चांदी खरेदीचा (Gold Silver Price) विचार करत असाल, तर ही बातमी सविस्तर वाचा. आज सोनं (Gold Price Today) आणि चांदीच्या दरात (Silver Price Today) वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर (Gold Silver Latest Rate) जाणून घ्या... वाचा सविस्तर
World Cup 2023: "त्यांच्या डोक्याला तोड नाही, जरा सुधरा यार..."; मोहम्मद शामीकडून नको ते बरळणाऱ्या पाकिस्तानींची धुलाई
ICC World Cup 2023 : 2023 च्या विश्वचषकादरम्यान (World Cup 2023) पाकिस्तानच्या (Pakistan) अनेक माजी खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाबाबत (Indian Cricket Team) परस्परविरोधी वक्तव्य केलेली. काही लोकांनी नाणेफेकीवरुन वाद घातला, तर काहींनी टीम इंडियाला (Team India) वेगळा चेंडू दिला जात असल्याचं सांगितलं. टीम इंडियावर सातत्यानं आरोप करणाऱ्यांना आता टीम इंडियाच्या हुकुमी एक्क्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे. टीम इंडियाचा धुरंदर मोहम्मद शामीनं (Mohammed Shami) सर्वांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत बोलताना शामी म्हणाला की, "मी कोणाला दोष देत नाही, मी फक्त प्रार्थना करतो की, आणखी 10 लोक येतील आणि असं परफॉर्म करतील. मला कधीच कोणाबाबत इर्षा वाटत नाही. जर तुम्ही इतरांच्या यशाचा आनंद घ्यायला शिकलात, तर मला वाटतं की, तुम्ही खूप चांगले खेळाडू व्हाल. मी काहीही करत नाही, फक्त जे काही माझ्याकडे आहे ती परमेश्वराची देण आहे." वाचा सविस्तर
Horoscope Today 22 November 2023 : आजचा बुधवार खास! फक्त 'या' राशींना राहावं लागणार सावध; पाहा सर्व 12 राशीचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 22 November 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 22 नोव्हेंबर 2023 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना आज व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या मनाच्या शांतिसाठी सिंह राशीचे लोक काही मंदिर वगैरेला भेट देऊ शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊया. वाचा सविस्तर
22 November In History: अमेरिका हादरली, राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची गोळ्या घालून हत्या, मद्रास राज्याचं नाव तामिळनाडू झालं; आज इतिहासात
22 November In History: इतिहासात आजचा दिवस हा अमेरिकेला हादरा देणारा ठरला. आजच्याच दिवशी 1963 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तसेच आजच्याच दिवशी 1968 साली मद्रास राज्याचं नाव बदलण्यात आलं आणि ते तामिळनाडू असं करण्यात आलं... वाचा सविस्तर